YouTube वर Video पाहिला अन् शेतकरी मालामाल, एकरात 15 लाखांची कमाई
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
सोलापुरातील एका शेतकऱ्याने YouTube वर एक व्हिडिओ पाहिला आणि आल्याची शेती केली. यातून एकरी 15 लाखांची कमाई होतेय.
advertisement
1/7

पारंपरिक शेतीला फाटा देत काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. सोलापूर शहरापासून जवळच असणाऱ्या बाळे येथे श्रीशैल कंनगी यांनी एक एकर शेतात अद्रकाची लागवड केली आहे.
advertisement
2/7
आतापर्यंत यासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च आला आहे. तर सुमारे 15 लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. विशेष म्हणजे युट्युबवर पाहून केलेला हा शेतीतील प्रयोग यशस्वी झाला आहे.
advertisement
3/7
सोलापुरातील सम्राट चौक येथील श्रीशैल मल्लिकार्जुन कंनगी यांची बाळे येथे शेती आहे.Youtube वरती व्हिडीओ पाहून श्रीशैल यांनी अद्रकच्या शेतीची माहिती घेतली आणि एका एकरात चारशे किलो अद्रकची बियाणे आणून बेड पद्धतीने लागवड केली.
advertisement
4/7
साधारणपणे एप्रिल महिन्यात अद्रकाच्या कंदांची लागवड केली होती. आठ महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच डिसेंबर महिन्यात अद्रक काढणीस तयार होते.
advertisement
5/7
या अद्रकाची विक्री सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केली जाते. साधारणपणे चांगल्या अद्रकला 60 रुपये किलो या दराने भाव मिळतो. अद्रकचे बियाणे, लागवडी, खत, औषध फवारणी यांचा सर्व मिळून दीड लाख रुपयापर्यंत खर्च आला आहे.
advertisement
6/7
या एका एकरातून सुमारे 15 लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे, अशी माहिती शेतकरी श्रीशैल कनगी यांनी दिली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, शेतकऱ्यांनी किमान अर्धा एकर क्षेत्रात अद्रकाची लागवड करावी. अद्रकांना बारमाही मागणी असते. तसेच त्याला दरही चांगला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू शकतात, असे कंनगी सांगतात.