Success Story : शेतीसोबत केला जोड धंदा, महिन्याला शेतकरी करतोय दीड लाख रुपयांची उलाढाल, असं काय केलं?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतीला पूरक बनवण्यासाठी अनेक शेतकरी जोड व्यवसाय करतात. कोणी गाय पालन, तर कोणी शेळीपालन अशा प्रकारचे विविध व्यवसाय करून अनेक जण यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत.
advertisement
1/5

शेतीला पूरक बनवण्यासाठी अनेक शेतकरी जोड व्यवसाय करतात. कोणी गाय पालन, तर कोणी शेळीपालन अशा प्रकारचे विविध व्यवसाय करून अनेक जण यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंबेफळ येथील योगेश गोजे हे गेल्या 6 वर्षांपासून गाय पालन करत आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी 2 गायींपासून व्यवसायाला सुरुवात केली होती. आजच्या घडीला त्यांच्याकडे 14 जर्सी गाई तर 10 वासरे आहेत.
advertisement
2/5
एका दिवसाला 130 लिटर दूध या गाई देत असतात आणि ते दूध संकलन केंद्रावर विक्री केले जाते. या दूध विक्रीच्या माध्यमातून 4 ते 5 हजार रुपयांची उलाढाल दररोज होते आणि 2500 रुपये मिळतात. तर महिन्याला दीड लाख रुपयांची उलाढाल होत असून खर्च वजा निव्वळ नफा 80 हजार रुपये मिळत असल्याचे गोजे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
3/5
कुंबेफळच्या योगेश गोजे यांनी सन 2019 मध्ये 2 गाय खरेदी केल्या व गाय पालनाला सुरुवात केली. गाय पालन क्षेत्रात अनुभव येत गेला, टप्प्याटप्प्याने त्यांनी आणखी गायी खरेदीला सुरुवात केली. आता त्यांच्याकडे एकूण 14 जर्सी गाई आणि दहा वासरे आहेत. या जनावरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था शेतीतूनच करतात. शेतामध्ये काही प्रमाणात घास लावण्यात आलेला आहे. तसेच काही ओले गवत, मुरघास, सुग्रास असा एका गाईसाठी 20 किलो चारा खाण्यासाठी दिला जातो.
advertisement
4/5
दररोज सकाळी 4:30 वाजल्यापासून गोठ्यातील काम सुरू होते. शेण काढणे, दूध काढणे ही कामे 8 वाजेपर्यंत पूर्ण केली जातात. गाईंच्या काढलेल्या शेणापासून शेणखत तयार होते ते शेणखत शेतीत वापरले जाते तसेच उर्वरित शेणखताची विक्री देखील केली जाते, असे गोजे यांनी म्हटले आहे.
advertisement
5/5
तरुण किंवा शेतकरी व गाय पालन करू इच्छिणाऱ्या नव व्यावसायिकांनी सर्वप्रथम या गायपालनासाठी स्वतःची मेहनत करण्याची तयारी ठेवावी तसेच एक किंवा दोन गाय खरेदी कराव्यात. गाय पालनातील अनुभवी व्यक्तीचे पालना संदर्भात मार्गदर्शन घ्यावे आणि टप्प्याटप्प्याने हा व्यवसाय पुढे चालवावा. तुम्हाला या क्षेत्रातला अनुभव आला असल्यास गाय पालन नफा मिळतो की तोटा यानुसार पुढील पावले उचलावी, अशी देखील प्रतिक्रिया गोजे यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : शेतीसोबत केला जोड धंदा, महिन्याला शेतकरी करतोय दीड लाख रुपयांची उलाढाल, असं काय केलं?