TRENDING:

अरुण तुपेचं 'ते' स्वप्न राहिलं अधुरे...! शूटच्या तयारीसाठी घेतलेली डुलकी ठरली अखेरची; नेमकं काय झालं?

Last Updated:
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ उलगडणार आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते असून, त्याच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
advertisement
1/7
अरुण तुपेचं 'ते' स्वप्न राहिलं अधुरे...! शूटच्या तयारीसाठी घेतलेली डुलकी ठरली अखेरची
सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला आणि आपल्या हटके शैलीने तरुण वर्गाला भुरळ घालणारा छत्रपती संभाजीनगरचा प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अरुण तुपे याचं मंगळवारी निधन झाले. घरी झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याने चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 24 तासांपूर्वीच सोशल मीडियावर रील शेअर करणारा अरुण दुसऱ्या दिवशी जगाचा निरोप घेईल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये.
advertisement
2/7
अरुणच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारची ती सकाळ अत्यंत सामान्य होती. अरुण सकाळी ६ वाजता झोपेतून उठला, घरातील लोकांशी नेहमीप्रमाणे हसून-खेळून बोलला.
advertisement
3/7
त्याला सकाळी 10 वाजता एका कॅफेच्या प्रमोशनच्या शूटला जायचे होते. त्यासाठी त्याने आपले कॅमेरे आणि सर्व साहित्य तयार करून ठेवले होते. मात्र, आई, खूप थकवा वाटतोय, थोडा वेळ झोपतो आणि मग शूटला जातो, असे सांगून तो पुन्हा झोपला.
advertisement
4/7
9 वाजता जेव्हा कुटुंबीयांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो शुद्धीवर नव्हता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.
advertisement
5/7
अरुण केवळ रील बनवणारा तरुण नव्हता, तर त्याला कलेची प्रचंड आवड होती. संभाजीनगरमध्ये एक असे मोठे प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्याची त्याची शेवटची इच्छा होती, जिथे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या गरीब मुलांना मोफत फिल्ममेकिंग आणि अभिनयाचे धडे घेता येतील.
advertisement
6/7
समाजासाठी काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून काम करणाऱ्या अरुणचा कॅमेरा रोल होण्यापूर्वीच शांत झाला. अरुणच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
7/7
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ उलगडणार आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते असून, त्याच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. एका उमद्या कलाकाराचा असा अचानक जाण्याने संभाजीनगरच्या कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
अरुण तुपेचं 'ते' स्वप्न राहिलं अधुरे...! शूटच्या तयारीसाठी घेतलेली डुलकी ठरली अखेरची; नेमकं काय झालं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल