अरे बापरे! १९ ऑक्टोबरपासून या राशींवर येणार संकट, काळजी घ्या अन्यथा क्षणार्धात होईल मोठं नुकसान
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनिचे नाते हे पिता-पुत्रासारखे आहे. सूर्य हा तेज, आत्मविश्वास आणि प्रकाशाचा प्रतीक आहे, तर शनि हा कर्म, शिस्त आणि संघर्षाचे द्योतक आहे.
advertisement
1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनिचे नाते हे पिता-पुत्रासारखे आहे. सूर्य हा तेज, आत्मविश्वास आणि प्रकाशाचा प्रतीक आहे, तर शनि हा कर्म, शिस्त आणि संघर्षाचे द्योतक आहे. या दोन्ही ग्रहांमधील विचारभेदामुळे त्यांचे संबंध तणावपूर्ण मानले जातात. आता १९ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:५८ वाजता सूर्य आणि शनि यांच्यात षडाष्टक युती तयार होत आहे. या ग्रहस्थितीचा परिणाम तीन राशींवर विशेषतः तीव्र होणार आहे. या राशींना आरोग्य, आर्थिक आणि मानसिक पातळीवर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
2/5
षडाष्टक म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह कुंडलीत १५० अंशांच्या कोनीय अंतरावर येतात तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. ‘षड’ म्हणजे सहा आणि ‘अष्टक’ म्हणजे आठ – म्हणजेच सहावे आणि आठवे घर, जे सामान्यतः अशुभ मानले जाते. या स्थितीत ग्रहांमधील ऊर्जा संघर्ष निर्माण करते, ज्यामुळे जीवनात अचानक अडथळे, हानी किंवा ताण वाढू शकतो.
advertisement
3/5
सिंह - सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य असल्यामुळे हा योग या राशीसाठी विशेष प्रभावी ठरेल. कार्यक्षेत्रात अडथळे, वरिष्ठांशी मतभेद आणि प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात गैरसमज, राग किंवा तणाव वाढू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने थकवा, रक्तदाब आणि डोकेदुखीचा त्रास संभवतो. उपाय: दररोज सकाळी सूर्याला पाण्याचा अर्घ्य द्या. आदित्य हृदय स्तोत्र पठण करा. शनिवारी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. गरजू व्यक्तींना काळे कपडे आणि तीळ दान करा.
advertisement
4/5
कर्क - या राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक ताण आणि आरोग्याच्या चढ-उताराचा असू शकतो. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील, पालकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढू शकते. कामातील अस्थिरता आणि आर्थिक योजना थोड्या विलंबाने पूर्ण होतील. उपाय: सोमवार आणि शनिवारी शिवलिंगावर दूध-पाणी अर्पण करा. महामृत्युंजय मंत्र रोज १०८ वेळा जपा. योग्य ज्योतिष सल्ल्यानंतर चांदीच्या अंगठीत मोती धारण करा.
advertisement
5/5
कुंभ - कुंभ राशीचा स्वामी शनि असल्याने, सूर्याशी असलेले त्याचे शत्रुत्व या काळात अधिक प्रभावी ठरेल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात अनिश्चितता वाढेल. भागीदारीतील मतभेद, फसवणूक किंवा वादांची शक्यता आहे. मानसिक ताण आणि आत्मविश्वासात घट जाणवू शकते. उपाय: शनिवारी काळे चणे, काळे तीळ आणि लोखंड दान करा. शनि स्तोत्र किंवा शनि चालीसाचे पठण नियमित करा. गरजू आणि कामगार वर्गाला मदत करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे बापरे! १९ ऑक्टोबरपासून या राशींवर येणार संकट, काळजी घ्या अन्यथा क्षणार्धात होईल मोठं नुकसान