अखेर शनिदेवाची कृपा झालीच! 3 ऑक्टोबरपर्यंत या राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार, मालामाल करणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shani Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना कर्मफळ देणारे देवता आणि न्यायाचे अधिष्ठाता मानले जाते. असे मानले जाते की, जो व्यक्ती सदैव चांगले कर्म करतो त्याच्यावर शनिदेव प्रसन्न राहतात.
advertisement
1/5

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना कर्मफळ देणारे देवता आणि न्यायाचे अधिष्ठाता मानले जाते. असे मानले जाते की, जो व्यक्ती सदैव चांगले कर्म करतो त्याच्यावर शनिदेव प्रसन्न राहतात. त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनातील अडचणी कमी होतात, गंभीर आजारांपासून बचाव होतो आणि यशाची संधी वाढते. नवग्रहांमध्ये शनि हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तो कर्म, दुःख, रोग, संघर्ष, नोकरी तसेच तंत्रज्ञानाचा कारक आहे. त्यामुळे कुंडलीत शनीची योग्य व मजबूत स्थिती लाभदायक ठरते, अन्यथा व्यक्तीला दीर्घकाळ संघर्ष करावा लागतो.
advertisement
2/5
शनीचा महत्त्वाचा गोचर पंचांगानुसार, 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:50 वाजता शनिदेव यांनी मीन राशीत उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या पदात प्रवेश केला आहे. हा प्रवास 3 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9:49 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात शनीच्या कृपेने तीन राशींना विशेष लाभ मिळणार असून त्यांच्या भाग्यात सकारात्मक बदल दिसून येतील.
advertisement
3/5
<strong>तूळ राशी</strong> - तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाचा आहे. कौटुंबिक जीवनात उद्भवू शकणारे संकट शनिदेवाच्या कृपेने दूर होईल. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना गुंतवणुकीतून अपेक्षित नफा मिळेल. तसेच, जुन्या मित्रांसोबत वेळ घालवल्याने मानसिक शांती लाभेल.
advertisement
4/5
<strong>मकर राशी -</strong> शनीची आवडती रास असल्याने मकर राशीच्या लोकांना या गोचराचा सर्वाधिक लाभ होणार आहे. व्यवसायातील अडथळे दूर होऊन उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. नोकरी करणाऱ्यांनी विरोधकांपासून सावध राहावे, मात्र परिश्रमामुळे ते वेळेवर आपली उद्दिष्टे पूर्ण करतील. घरगुती वाद, विशेषतः मालमत्तेसंबंधीचे, संपुष्टात येऊ शकतात. हा काळ स्थैर्य व यश देणारा ठरेल.
advertisement
5/5
<strong>कुंभ -</strong> कुंभ राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. व्यवसायात स्पर्धकांवर विजय मिळवून आत्मविश्वास वाढेल. अविवाहितांना कौटुंबिक कार्यक्रमात जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणारे वेळेपूर्वी लक्ष्य साध्य करतील आणि त्यामुळे पगारवाढ किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ लाभदायी ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अखेर शनिदेवाची कृपा झालीच! 3 ऑक्टोबरपर्यंत या राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार, मालामाल करणार