TRENDING:

4 मोठ्या ग्रहांमध्ये 3 राशीच्या लोकांचा मोठा फायदा, जूनमध्ये होणार श्रीमंत, नोकरीतही मिळणार यश

Last Updated:
ज्योतिष शास्त्रानुसार, ठराविक वेळी ग्रह राशी परिवर्तन करतात. याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पाहायला मिळतो. काहीवेळा अनेकांना त्याचा फायदा होतो. तर काहींचे नुकसानही होते. अशावेळी 4 ग्रहांमुळे आता 3 राशीच्या लोकांचे नशिब बदलणार आहे. (परमजीत कुमार/देवघर, प्रतिनिधी)
advertisement
1/7
4 मोठ्या ग्रहांमध्ये 3 राशीच्या लोकांचा मोठा फायदा, जूनमध्ये होणार श्रीमंत...
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 त्यांनी सांगितले की, जून महिना ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने खास आहे. या महिन्यात 4 मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. सोबतच शनिही आपल्या चालीत परिवर्तन करणा आहे.
advertisement
2/7
1 जूनला मंगळ ग्रह मेष राशीत जाईल. मेष मंगळाची राशी असल्याने याठिकाणी रूचक राजयोग तयार होईल. 12 जूनला शुक्र ग्रह मिथुन राशीत जाईल. शुक्राचे गोचरही खास आहे. 14 जून रोजी बुध ग्रहसुद्धा मिथुन राशीत जाईल. 15 जूनला सूर्यसुद्धा मिथुन राशीत जाईल. या दिवशी मिथुन संक्रांती असेल.
advertisement
3/7
मिथुन राशीत शुक्र, बुध आणि सूर्याच्या गोचरमुळे 15 जूनला त्रिग्रही योग तयार होणार आहे. सोबतच शनि 2 जूनला नक्षत्र परिवर्तन करणार आहे. यामुळे गुरूच्या नक्षत्र पूर्वाभाद्रपदमध्ये संचरण करेल. याशिवाय 29 जून रोजी वक्रीही होणार आहे. या सर्व परिस्थितीचा तीन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.
advertisement
4/7
मेष : या राशीच्या लोकांना व्यवसाय-करिअरमध्ये गती मिळणार आहे. संतती पक्षाकडून चांगली बातमी मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. पूर्वजांच्या संपत्तीचे वाद संपतील
advertisement
5/7
वृषभ : या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. शेअर बाजारात पैसे लावत असाल तर नफा होईल. व्यापाराचा विस्तार होईल. नवीन मित्रांशी भेट होईल.
advertisement
6/7
सिंह : या राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप सकारात्मक राहणार आहे. घरात शुभ कार्य होऊ शकते. वडिलांच्या सहकार्याने थांबलेले कार्य पूर्ण होईल. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहू शकते. उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात. खर्च कमी आणि उत्पन्न वाढेल. बँक बॅलन्स वाढेल. नोकरी करत असलेल्यांना आवडीची ट्रान्सफर पोस्टिंग मिळण्याच योग. तसेच आपल्या जोडीदारासह यात्रेला बाहेर जाऊ शकतात.
advertisement
7/7
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
4 मोठ्या ग्रहांमध्ये 3 राशीच्या लोकांचा मोठा फायदा, जूनमध्ये होणार श्रीमंत, नोकरीतही मिळणार यश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल