Aajache Rashibhavishya: अचानक धनलाभ होणार, तुमचं नशीबच पालटणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: राशीभविष्यात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. शुक्रवार, 4 जुलै रोजीचं तुमच्या राशीचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13

मेष राशी - शारीरिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी धूम्रपान करणे सोडा. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - या राशीतील काही लोकांना आज संतानपक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आज कार्यक्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. घरातील कामे पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आशा आकांक्षा सोडू नका, अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मध्येमध्ये थोडा आराम करा. आज तुम्ही धनसंबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित राहू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्राचा सल्ला घेतला पाहिजे. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
7/13
तुळ राशी - काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. प्रेम प्रकरण थोडेसे कठीण असेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. झाला, पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देईल - त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल - थोडा आराम करा आणि सात्त्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. घरातील दुरुस्तीची कामे अथवा सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा आहे.
advertisement
12/13
मीन राशी - आज तुमच्या ऑफिसचा कुणी सहकर्मी तुमची किंमती वस्तू चोरू शकतो. म्हणून, आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. अचानक प्रवास होऊ शकतो. यामुळे थोडा थकवा हा तुम्हाला येईल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेणे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: अचानक धनलाभ होणार, तुमचं नशीबच पालटणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य