Aajache Rashibhavishya: हात लावाल त्याचं सोनं होईल, शुक्रवारी नशीब पालटणार, पण ‘ही’ चूक नको, आजचं राशीभविष्य
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Daily Horoscope: आज, शुक्रवारी मेष ते मीन राशींचं ग्रहमान अनुकूल आहे. ज्योतिषी अशोक पाटील यांनी आजचं राशीभविष्य सांगितलं आहे
advertisement
1/13

मेष राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस हा उत्तम असणार आहे. तुम्ही मेहनत करत असलेल्या कामामध्ये आज यश मिळण्याची दाट शक्यता आहे. शनि-मंगळ युतीचा प्रभाव तुमच्यावर असणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असणार आहे. राशीचा स्वामी शुक्र बुधासोबत द्वादश स्थानात असल्यामुळे छोट्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही जर फोकसने काम केलं तर या अडचणीवर नक्कीच मात करू शकता.कामामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष नका. एखाद्या शुभ कार्यात खर्च कराल.
advertisement
3/13
मिथुन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस मस्त जाणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य तुम्हाला पुढे येऊन जाईल. नवम स्थानात कुंभ राशीतील राहू आणि द्वितीय/केंद्र स्थानात गुरू असल्यामुळे आजचा दिवस चांगला जाणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जवळच्या व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/13
सिंह राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस ठीक असेल. कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांततेने परिस्थिती हाताळा. कोणतेही काम घाईत करू नका. संयम ठेवा. नोकरीत नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या संधीचा फायदा घ्या
advertisement
6/13
कन्या राशीसाठी व्यक्तीसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. काही कामात विलंब होण्याची शक्यता आहे. कन्या राशीचा स्वामी बुध षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाचे नियोजन लावणे महत्त्वाचे आहे.
advertisement
7/13
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभयोग घेऊन येत आहे. अनेक चांगले बदल तुम्हाला दिवसभरात पाहायला मिळतील. अचानक कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसे येतील. प्रलंबित काम पूर्ण होतील. आज प्रवासाचा योग देखील आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस प्रभावशाली असणार आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी तुमचा प्रभाव पडेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ कुंभ राशीत आणि चंद्र मेष राशीत षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे. यामुळे तुमचा प्रभाव वाढणार आहे. चांगली संधी मिळू शकते.
advertisement
9/13
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन काही सुरुवात करण्यासाठी उत्तम योग घेऊन येत आहे. आज नवीन योजना आखण्यासाठी योग्य वेळ आहे. मित्र आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. सकारात्मक विचार ठेवा.
advertisement
10/13
मकर राशीच्या व्यक्तींचा दिवस कामात जाणार असून तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. या कामामुळे ताण वाढू शकतो. वेळेचे योग्य नियोजन करा. कुटुंबासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.
advertisement
11/13
कुंभ राशीच्या लोकांनी आज सावधानगिरी बाळगावी. तुमच्या राशीत चंद्र तृतीय स्थानातील मेष राशीत भ्रमण करत आहे. त्यामुळे व्यवहार आणि पैशांची देवाण घेवाण करताना सावध राहा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रभाव जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
12/13
मीन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस अतिउत्तम असून तुमच्या राशीत राज्यविजयकारक योग आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धकांवर तुम्ही नक्कीच भारी पडणार आहात. परंतु महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कामातील अडथळे दूर होतील. कुटुंबीयांसोबत आनंदी वेळ जाईल.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: हात लावाल त्याचं सोनं होईल, शुक्रवारी नशीब पालटणार, पण ‘ही’ चूक नको, आजचं राशीभविष्य