EV कार चार्जिंगनं आख्खं घर भस्मसात, हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त, 8 जणांच्या अंताची रडू आणणारी घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मध्य प्रदेशच्या इंदूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. एक ईव्ही कार या कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरली आहे.
advertisement
1/8

मध्य प्रदेशच्या इंदूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. एक ईव्ही कार या कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरली आहे.
advertisement
2/8
रात्री घराबाहेर चार्जिंगला लावलेल्या कारमध्ये झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीनंतर ही भीषण दुर्घटना घडली. आठही जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
3/8
ही घटना इंदूर शहराच्या टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथील आलिशान घरात हा प्रकार घडला.
advertisement
4/8
ज्या घराला आग लागली तो एक आलिशान बंगला होता. घटनेनंतर छत फोडून आत प्रवेश करावा लागला. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंटवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आलं आहे.
advertisement
5/8
घराच्या आत काही प्रकारचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे; हा स्फोट गॅस सिलिंडर्समुळे झाला की अन्य कशामुळे, हे निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे.
advertisement
6/8
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दरवाजे तोडून उघडावे लागले; आगीचा थेट परिणाम म्हणून वीजपुरवठा खंडित झाला असावा आणि त्यामुळेच दरवाजे आपोआप बंद (लॉक) झाले असावेत, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
advertisement
7/8
घराच्या आत मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य साठवून ठेवलेले असल्यामुळे, ही आग अत्यंत वेगाने पसरली. या घटनेतील मृतांमध्ये एका मुलीचा आणि एका मुलाचा समावेश असून, या दोघांचंही वय १० ते १२ वर्षांच्या दरम्यान होते.
advertisement
8/8
कुटुंब प्रमुख मनोज पुगलिया, सिमरन सेठिया, राशि सेठिया (वय -12), विजय सेठिया, छोटू सेठिया आणि सुमन असं मृत पावलेल्या लोकांची नावं आहेत. पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतली आहे. पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
EV कार चार्जिंगनं आख्खं घर भस्मसात, हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त, 8 जणांच्या अंताची रडू आणणारी घटना