नेते CM चा चेहरा म्हणून पाहायचे पण निघाली 'गद्दार', कोण आहेत सोफिया फिरदौस? ज्यांनी केला काँग्रेसचा गेम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोफिया फिरदौस, ओडिशातील पहिल्या मुस्लिम महिला आमदार, काँग्रेसच्या आदेशाविरुद्ध क्रॉस व्होटिंग केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी. त्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.
advertisement
1/7

2024 च्या निवडणुकीत एक नाव प्रचंड गाजल, दिसायला रुपवती आणि तितकीच सडेतोड बोलणारी, बेधकड आणि मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा बनू शकता असा विश्वास पक्षाला वाटणारी ही महिला गद्दार निघाली. 2026 च्या निवडणुकीदरम्यान या महिलेनं जे केलं त्यामुळे काँग्रेसला चांगलाच धक्का बसला.
advertisement
2/7
ओडिशाच्या राजकारणात २०२४ च्या निवडणुकीत एक नाव प्रचंड गाजलं, ते म्हणजे सोफिया फिरदौस. राज्यातील पहिल्या मुस्लिम महिला आमदार होण्याचा मान मिळवत त्यांनी इतिहास रचला खरा पण त्यांच्या एका गोष्टीनं पक्षात नाराजी देखील मिळवली.
advertisement
3/7
उच्चशिक्षित, कॉर्पोरेट जगतातला अनुभव आणि वडिलांचा राजकीय वारसा यामुळे काँग्रेस हायकमांड त्यांच्याकडे एक सक्षम नेतृत्व म्हणून पाहत होतं. पण, राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्याच पक्षाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत 'क्रॉस व्होटिंग' केलं आणि काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली.
advertisement
4/7
सोफिया फिरदौस या पेशाने सिव्हिल इंजिनिअर आणि मॅनेजर आहेत. त्यांचे वडील मोहम्मद मोकीम यांना एका प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली होती. अशा कठीण काळात सोफिया यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरून भाजपच्या दिग्गज उमेदवाराचा ८,००० मतांनी पराभव केला.
advertisement
5/7
या विजयानंतर त्यांना राजकारणातील 'जायंट किलर' म्हटलं जाऊ लागलं. मात्र, विजयाचा हा गुलाल सुकण्यापूर्वीच त्यांनी पक्षाविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले. ओडिशात राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी मतदान झाले. काँग्रेसने BJD उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सोफिया यांनी या निर्णयाला जाहीर विरोध केला. पक्षाने दिलेला व्हिप धुडकावत त्यांनी पक्षविरोधी मतदान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
advertisement
6/7
पक्षाने बीजेडीला पाठिंबा देण्यापूर्वी स्थानिक आमदारांना विश्वासात घेतलं नाही. मात्र, पक्षाने शिस्तभंग केल्याचा दावा केला आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. सोफिया यांचं म्हणणं देखील कुणीच ऐकून घेतलं नाही. पक्षानं थेट कारवाई केली, त्यानंतर त्या तुफान चर्चेत आल्या.
advertisement
7/7
सोफिया फिरदौस यांची सार्वजनिक विधानं आणि मतदानाच्या वेळी घेतलेली भूमिका यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या घटनेची गंभीर दखल घेत सोफिया यांची काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून हकालपट्टी केली . ज्या सोफियांकडे पक्षाचं भविष्य म्हणून पाहिलं जात होतं, त्यांनीच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
नेते CM चा चेहरा म्हणून पाहायचे पण निघाली 'गद्दार', कोण आहेत सोफिया फिरदौस? ज्यांनी केला काँग्रेसचा गेम