TRENDING:

नोरा फतेहीच्या गाण्यावरून वाद भडकला! रिलीजच्या 48 तासांतच कारवाई, निर्मात्यांचा मोठा निर्णय

Last Updated:
Nora Fatehi Controversy: या गाण्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. गाण्यातील अश्लील शब्द आणि आक्षेपार्ह चित्रण यामुळे या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.
advertisement
1/10
नोरा फतेहीच्या गाण्यावरून वाद भडकला! रिलीजच्या 48 तासांतच निर्मात्यांचा मोठा निर्णय
मुंबई : नोरा फेतही म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते तिचे एकापेक्षा एक सरस आयटम साँग्स. तिचा दमदार डान्स पाहून कोणालाही तिच्यासोबत नाचण्याचा मोह आवरता येणार नाही.
advertisement
2/10
आजवर तिने अनेक आयटम साँग्स आणि म्युझिक अल्बम्समध्ये तिच्या बोल्ड मूव्ह्सनी प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. पण सध्या हीच नोरा फतेही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
advertisement
3/10
दोन दिवसांपूर्वीच नोराच्या आगामी कन्नड फिल्म 'केडी - द डेविल' मधील गाणं 'सरके चुनर तेरी सरके' रिलीज झालं होतं. मात्र रिलीज झाल्याच्या काही वेळातच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. गाण्यातील शब्दरचना आणि डान्स पाहून इंटरनेटवर या गाण्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
advertisement
4/10
विशेष म्हणजे या गाण्यात बॉलिवूडचा लाडका संजूबाबाही नोरा फतेहीसोबत ठेका धरताना दिसला आहे. या गाण्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. गाण्यातील अश्लील शब्द आणि आक्षेपार्ह चित्रण यामुळे या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.
advertisement
5/10
१५ मार्चला हे गाणं रिलीज झालं आणि काही तासांतच यावर टीकेची झोड उठवली जाऊ लागली. रकीब आलम यांनी लिहिलेल्या या गाण्याला अतिशय खालच्या पातळीचे गाणे म्हटले जात आहे. अखेर वाढता वाद पाहून निर्मात्यांनी एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे.
advertisement
6/10
नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे सदस्य प्रियंक कानूनगो यांनी या गाण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. "कोणताही सुसंस्कृत माणूस आपल्या कुटुंबासोबत बसून हे गाणं पाहू शकतो का?" असा बोचरा सवालही त्यांनी केला.
advertisement
7/10
इतकंच नाही, तर इंडस्ट्रीतील काही मंडळींनीही या गाण्यावर नाराजी व्यक्त केली. गायक अरमान मलिक आणि दिग्दर्शक ओनिर यांनी देखील 'X' वर पोस्ट करून या गाण्यातील लेखनावर टीका केली. अरमान मलिकने तर या गाण्याला लो-लेव्हल रायटिंग म्हटलं आहे.
advertisement
8/10
एका वकिलाने या गाण्याविरोधात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे तक्रार दाखल केली. या गाण्याचा तरुण पिढीवर आणि लहान मुलांवर घातक परिणाम होऊ शकतो, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, आता हे प्रकरण थेट माहिती व प्रसारण मंत्रालयापर्यंत पोहोचल्यामुळे निर्मात्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
advertisement
9/10
प्रकरण अंगाशी येत असल्याचं पाहून मेकर्सनी एक मोठा निर्णय घेतला. कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय 'केडी'च्या निर्मात्यांनी हे गाणं यूट्यूबवरून हटवलं आहे. आता तुम्ही यूट्यूबवर हे गाणं सर्च केलं तर ते प्रायव्हेट किंवा उपलब्ध नाही असं दाखवत आहे.
advertisement
10/10
दरम्यान, चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट १९७० च्या दशकातील बंगळुरूमध्ये घडलेल्या खऱ्या घटनांवर आधारित आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार ध्रुव सरजा मुख्य भूमिकेत आहे, तर संजय दत्त, शिल्पा शेट्टी आणि नोरा फतेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा बहुचर्चित चित्रपट ३० एप्रिल २०२६ रोजी रिलीज होण्याच्या तयारीत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नोरा फतेहीच्या गाण्यावरून वाद भडकला! रिलीजच्या 48 तासांतच कारवाई, निर्मात्यांचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल