TRENDING:

Gold Price Prediction: युद्ध पेटलं अन् डॉलरने केला सोनं-चांदीचा गेम, मार्केटमध्ये सर्वात मोठा क्रॅश, 72 तासांत काय होणार?

Last Updated:

Gold Price Prediction: जेव्हा जेव्हा जगात युद्ध होतं, तेव्हा सोन्याचे भाव गगनाला भिडतात. मात्र, सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाने हा नियम मोडीत काढला आहे.

advertisement
मुंबई: जगभरात राजकीय, भू-राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय शोधला जातो. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेचा एक अलिखित नियमानुसार, जेव्हा जेव्हा जगात युद्ध होतं, तेव्हा सोन्याचे भाव गगनाला भिडतात. मात्र, सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाने हा नियम मोडीत काढला आहे. युद्धाच्या या धगधगत्या वातावरणात भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. विशेषतः चांदीच्या दरात तर जणू 'क्रॅश'च आला आहे.
News18
News18
advertisement

काय आहे या उलट ट्रेंडचं कारण?

सेबी नोंदणीकृत मार्केट एक्सपर्ट अनिल राय यांनी या विचित्र परिस्थितीमागचं नेमकं कारण उघड केलं आहे. त्यांच्या मते, यावेळच्या युद्धाचं मुख्य कारण 'तेल' (Oil) आहे. जेव्हा तेलाचे भाव वाढतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम डॉलरच्या मजबुतीवर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर निर्देशांक (Dollar Index) १०० च्या पार गेल्यामुळे सोन्याची खरेदी थंडावली आहे. डॉलर महागला की सोन्याची मागणी आणि मूल्य दोन्ही कमी होतात, हाच अर्थशास्त्राचा नियम यावेळी सोन्याच्या दराच्या मुळावर आला आहे.

advertisement

गुंतवणूकदारांनी काय करावं?

राय यांच्या मते, सध्या मार्केटमध्ये सोन्याच्या भावाची दमछाक झाल्याचे संकेत देत आहेत. "जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, तर सोनं कधीच विकू नका. मात्र, ट्रेडर असाल तर सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. सोन्याच्या किंमती अजून खाली येऊ शकतात," असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. फिजिकल सोनं खरेदी करण्यापेक्षा सध्या लोक ETF कडे वळत आहेत, पण तिथेही काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, असेही राय यांनी स्पष्ट केले.

advertisement

सोनं घसरणार, पण चांदी सावरणार!

सोनं पडत असलं तरी चांदीचा दर मात्र पुन्हा वधारणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या केवळ सोलर पॅनलच नाही, तर AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) साठी लागणाऱ्या डेटा सेंटर्समध्ये चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे भविष्यात चांदीची मागणी वाढणार असून सोन्यापेक्षा अधिक चांगले रिटर्न मिळू शकतात असे त्यांनी म्हटले.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Gold Price Prediction: युद्ध पेटलं अन् डॉलरने केला सोनं-चांदीचा गेम, मार्केटमध्ये सर्वात मोठा क्रॅश, 72 तासांत काय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल