TRENDING:

भाईचा बड्डे महागात! उल्हासनगरात तुरुंगाबाहेर फटाके फोडले, पोलिसांनी अशी घडवली अद्दल

Last Updated:

Thane News: सत्या भाईच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर फटाके फोडल्याचा जल्लोष आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण: उल्हासनगरमधील कुख्यात गुंड सतीश कांबळे उर्फ सत्या भाई गेल्या सहा वर्षांपासून कल्याणमधील आधारवाडीच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. नुकतेच रविवारवारी त्याचा वाढदिवस होता. त्याच्या समर्थकांनी थेट तुरुंगाबाहेर फटाके फोडून वाढदिवसाचा जल्लोष साजरा केला. पोलिसांनी विरोध करून देखील समर्थकांनी फटाके फोडले. मात्र, आता हे प्रकरण चार समर्थकांना चांगलंच महागात पडलंय.
Thane News: भाईचा बड्डे महागात! उल्हासनगरात तुरुंगाबाहेर फटाके फोडले, पोलिसांनी अशी घडवली अद्दल
Thane News: भाईचा बड्डे महागात! उल्हासनगरात तुरुंगाबाहेर फटाके फोडले, पोलिसांनी अशी घडवली अद्दल
advertisement

सत्या भाईच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर फटाके फोडल्याचा आनंद आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेने पोलीस आणि तुरुंग प्रशासनाला आव्हान दिल्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आधारवाडी कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी अभिजीत कोळी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

advertisement

कार विक्री पडली महागात, वकिलालाचं घातला 37 लाखांचा गंडा, ठाण्यात विचित्र घटना

आरोपी अटकेत

सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलीस पथकाने तपास केला. यामध्ये उल्हासनगरचा रोहित गणेश जगदाळे, क्षीतिज भगत, आकाश खडसे, यांना अटक करण्यात आली आहे. रोहित जगदाळे हा एका खून प्रकरणात तुरुंगात होता. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनामुळे बाहेर आला आहे. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
300 रुपयांना खरेदी करा अन् 500 ला विका, व्यवसायासाठी होलसेल भावात शर्ट्स, पिंपरीत हे आहे मार्केट
सर्व पहा

दरम्यान, या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी जिथे फटाके फोडले त्या परिसरातून त्यांची धिंड काढली. संबंधित प्रकरणातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या/ठाणे/
भाईचा बड्डे महागात! उल्हासनगरात तुरुंगाबाहेर फटाके फोडले, पोलिसांनी अशी घडवली अद्दल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल