TRENDING:

ShaniDev: अक्षय तृतीयेपूर्वीच शनी देणार गिफ्ट! या राशींचा सुवर्णकाळ सुरू करेल, नशीब साथ देणार

Last Updated:
ShaniDev akshaya tritiya: अक्षय तृतिया जवळ आली असल्यानं सध्या चर्चेचा विषय आहे. अक्षय तृतियेआधी ज्योतिषशास्त्रात एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. एप्रिलमध्ये शनिच्या स्थितीत पुन्हा बदल पाहायला मिळेल, याचा सर्व राशींवर परिणाम दिसून येईल.
advertisement
1/6
अक्षय तृतीयेपूर्वीच शनी देणार गिफ्ट! या राशींचा सुवर्णकाळ सुरू करेल, नशिबाची साथ
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव हे कर्मानुसार फळ देतात, म्हणून त्यांना न्यायाधीशही म्हटले जाते. तसं पाहायला गेलं तर ग्रह आणि राशींमध्ये एक विशेष संबंध आहे. नऊ ग्रहांपैकी, शनि ग्रह हा सर्वात संथ गतीने आपली राशी बदलण्यासाठी ओळखला जातो.
advertisement
2/6
ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाधीश शनि ग्रह देखील नक्षत्र बदलण्यासाठी वेळ घेतो. सध्या शनि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात आहे. वैदिक पंचांगानुसार, अक्षय्य तृतीयेपूर्वी शनि सोमवार, 28 एप्रिल रोजी सकाळी 07:52 वाजता उत्तरभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करेल. 26 व्या नक्षत्रात शनीचे भ्रमण हे 3 राशींचे नशीब पालटू शकते, जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?
advertisement
3/6
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी, उत्तरभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश शुभ राहील. आत्मविश्वास वाढेल. तो चांगला काळ असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकेल. व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. परस्पर मतभेद दूर होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्रातील बदल खूप शुभ राहील. अद्याप पूर्ण न झालेली अनेक कामे लवकरच पूर्ण होऊ शकतात. बिघडलेली कामेही दुरुस्त होतील. मन अधिक प्रसन्न राहील. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नात्यात गोडवा येऊ शकतो. तुम्ही नवीन काम करण्याचा विचार करू शकता. व्यवसायात नफा होऊ शकतो. बाहेर जाण्याचे बेत आखता येतील.
advertisement
5/6
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्रातील बदल खूप शुभ राहील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्य आधीपेक्षा चांगले राहील. व्यवसायात यश मिळू शकेल. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. डोक्यावरील कर्जातून सुटका मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
हिंदू सनातन धर्मात अक्षय तृतीयेच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी साजरी होतोय. असे म्हटले जाते की, या दिवशी केलेल्या चांगल्या गोष्टींचे फळ शाश्वत असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: अक्षय तृतीयेपूर्वीच शनी देणार गिफ्ट! या राशींचा सुवर्णकाळ सुरू करेल, नशीब साथ देणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल