TRENDING:

Monthly Horoscope: डिसेंबर महिना या राशींना वरदान! वर्षाचा शेवट गोड, नुकसान भरून निघणार

Last Updated:
December Monthly Horoscope in Marathi: कसा असेल डिसेंबर महिना, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा डिसेंबर महिन्याचे मासिक राशीभविष्य
advertisement
1/6
डिसेंबर महिना या राशींना वरदान! वर्षाचा शेवट गोड, नुकसान भरून निघणार
मीन (Pisces) : महिना चांगला जाईल. विवाहित व्यक्तींना कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. समन्वयाअभावी गोष्टी चुकतील. त्यामुळे सावधगिरी बाळगा. प्रेमजीवन अनुकूल असेल. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील दुरावा कमी होईल. तुम्ही भविष्याबाबत एकत्रित योजना आखाल. दीर्घ कालावधीनंतर तुमच्या योजना यशस्वी होतील. उत्पन्न वाढून खर्च कमी होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. मौजमजेसाठी काही पैसे खर्च कराल. नोकरीत तुमची कुशाग्र बुद्धिमत्ता उपयुक्त ठरेल. इतरांच्या तुलनेत तुमची कामगिरी चांगली असेल. त्यामुळे तुमचे कौतुक होईल. व्यवसायात हा कालावधी चढ- उताराचा असेल. कामासाठी जास्त प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास फायदेशीर ठरेल. व्यावसायिक भागीदाराशी काही गैरसमज होऊ शकतात. ते वेळीच सोडवण्याचा प्रयत्न करा. उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करतील. आरोग्य चांगले राहील; पण किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल असेल.
advertisement
2/6
मिथुन (Gemini) : महिना चांगला असेल. सुसंवाद फायदेशीर ठरेल. जवळच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. प्रेमसंबंधासाठी कालावधी अनुकूल आहे. रोमँटिक संवाद आणि परदेशात खरेदी फायदेशीर ठरेल. एकमेकांना खास सरप्राईज द्याल. प्रेक्षणीय ठिकाणे आणि खास शास्त्रीय स्थळांना भेट देऊ शकता. नोकरीसाठी कालावधी चांगला आहे. तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तुमच्या विरूध्द कारस्थान केले जावू शकते. त्यामुळे सावध राहा. व्यवसायासाठी कालावधी उत्तम आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर व्यवसायात पुढे जाण्याचा मार्ग सापडेल. हा मार्ग तुमच्यासाठी फायदेशीर असेल. विद्यार्थ्यांना महिना चांगला असेल. मेहनतीचे फळ मिळेल. अभ्यासाचे चांगले रिझल्ट मिळतील. आरोग्याबाबत मोठी समस्या जाणवणार नाही; पण छोट्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. प्रवासासाठी पहिला आणि तिसरा आठवडा चांगला असेल.
advertisement
3/6
कर्क (Cancer) : महिना अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखण्यात यशस्वी होतील. किरकोळ समस्या बऱ्याच अंशी सुटतील. वैवाहिक जीवन किती चांगले आहे हे समजेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मुलांसाठी हा कालावधी काहीसा प्रतिकूल आहे. त्यांची तब्येत बिघडू शकते. प्रेमजीवनात तुम्हाला नात्याचा राग येईल. जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. त्यामुळे विचारपूर्वक पुढे जा. कारण ही वेळ नात्यासाठी अनुकूल नाही. उत्पन्नात चांगली वाढ होईल. त्यामुळे तुम्ही सुस्थितीत असाल. नोकरदार व्यक्तींसाठी महिना चांगला आहे. अनुभवामुळे तुम्ही सुस्थितीत राहाल. तुमचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल. त्यामुळे प्रमोशनची संधी मिळू शकते. व्यावसायिकांनी या कालावधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. मजबूत विचार फायदेशीर ठरतील. तुम्हाला तुमच्या कामात पुढे जाण्याची संधी मिळेल. नवीन लोकांशी संपर्क साधाल. सरकारी क्षेत्रातील लोक तुम्हाला मदत करतील. त्यामुळे तुमची व्यावसायिक प्रगती होईल.
advertisement
4/6
सिंह (Leo) : महिना चांगला आहे. विवाहित व्यक्ती कौटुंबिक समस्यांमधून बाहेर पडतील. जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. प्रेमजीवनासाठी महिना खूप चांगला आहे. तुमच्या भावना प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचू शकाल. तुम्ही तिला/त्याला प्रपोज केले तर होकार मिळू शकतो. रिलेशनशिपमध्ये असाल तर हा कालावधी चांगला आहे. स्वतःचे घर बांधू शकाल. एखाद्या मालमत्तेसाठी प्रयत्न करत असाल तर ती तुमच्या ताब्यात येईल. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना चांगला फायदा होईल. सरकारी निवासस्थान मिळू शकते. नोकरदार व्यक्तींसाठी महिना चांगला आहे. मेहनत यशस्वी होईल. व्यावसायिकांचे काम वाढेल. कामासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, तरच यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. त्यांना अभ्यासात रस असेल. रोज नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होईल. अभ्यासात चांगले गुण मिळू शकतात. आरोग्य चांगले राहील; पण दिनचर्या सांभाळा. आहाराकडे लक्ष द्या. महिन्यातील दुसरा आणि चौथा आठवडा प्रवासासाठी चांगला असेल.
advertisement
5/6
कन्या (Virgo) : महिना अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती कौटुंबिक जीवनातील तणाव दूर करण्यासाठी नवीन योजना आखतील. या योजना यशस्वी होतील. सासरकडील मंडळींशी तुमचे संबंध सौहार्दाचे राहतील. तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी प्रिय व्यक्तीला सांगाल. मोठ्या बँकेकडून कर्ज घेऊ शकता. प्रेमजीवनात हा कालावधी चांगला असेल. तुमचा कल आनंद घेण्याकडे असेल. चांगल्या गोष्टीवर पैसे खर्च कराल. प्रवासात फायदा होईल. नवीन कार खरेदी करू शकता. व्यवसायात गती येईल. तुमच्या योजना यशस्वी ठरतील. लॉटरी आणि शेअर्समध्ये नफा मिळू शकतो. सरकारी क्षेत्रात फायदा होऊ शकतो. तुम्ही जिथे काम कराल, तेथील लोक तुम्हाला पाठिंबा देतील. कामात सकारात्मकता वाढेल. तुमचा आत्मविश्वास बळकट होईल. उत्तम जेवणाचा आनंद घ्याल. घरात एखादे कार्य होऊ शकते. त्यामुळे घऱात लोकांची ये-जा असेल. व्यवसायात चढ-उतार जाणवेल. विद्यार्थी अभ्यासात मेहनत घेतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. फिटनेससाठी व्यायामाकडे लक्ष द्या. महिन्यातील पहिला आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल राहील.
advertisement
6/6
तूळ (Libra) : महिना चांगला जाईल. हृदयात प्रेमाची भावना असेल. आसपासच्या लोकांना आनंदी ठेवाल. विवाहित व्यक्ती आनंदी असतील. तुमच्या नात्यात प्रणय, प्रेम आणि आपुलकी असेल. काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आता दूर होईल. वैयक्तिक जीवनाचा आनंद घ्याल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. दोघं मिळून नवीन काम सुरू करू शकता. प्रेमजीवनात हा कालावधी महत्त्वाचा असेल. तुम्ही जर तुमच्या प्रियकर/ प्रेयसीला प्रेमानं समजून सांगितले तर ती/तो विवाहासाठी तयार होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात आनंद असेल. तुमचा बँकबॅलन्स वाढेल. हलका मानसिक ताण असेल पण जास्त चिंतेचे कारण नाही. तुम्ही खूप परिश्रम कराल. स्मार्ट वर्क मुळे चांगली प्रतिष्ठा मिळेल. व्यवसायासाठी कालावधी अनुकूल आहे. व्यवसायासाठी काही गोष्टी कराल. यातून फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. तुम्हाला चांगले अन्न खावेसे वाटेल; पण तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. महिन्यातील पहिला आणि चौथा आठवडा ड्रायव्हिंगसाठी चांगला असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Monthly Horoscope: डिसेंबर महिना या राशींना वरदान! वर्षाचा शेवट गोड, नुकसान भरून निघणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल