Today Horoscope: धूलिवंदनचा दिवस कोणासाठी भाग्याचा? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीभविष्य
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Today Horoscope: होळीनंतर मंगळवारी धूलिवंदन आणि चंद्रग्रहण असणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीवरून धूलिवंदनचा दिवस राशीचक्रावर कसा प्रभाव टाकेल याविषयी ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेले दैनिक राशीभविष्य जाणून घेऊ. मंगळवार 3 मार्चचा दिवस राशीनुसार कोणासाठी कसा असेल पाहुया.
advertisement
1/12

मेष - आजचा दिवस मेष राशीसाठी खूप धावपळीचा पण तितकाच सकारात्मक असेल. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही तुमची कामं अधिक जिद्दीने आणि उत्साहाने पूर्ण कराल. तुमच्या डोक्यातल्या आयडिया मांडायला अजिबात घाबरू नका, कारण त्यातून इतरांना प्रेरणा मिळू शकते. आरोग्यासाठी व्यायाम आणि चांगल्या आहारावर भर द्या. मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ योगा किंवा ध्यान करा. आज तुम्ही तुमच्या क्षमतांचा पुरेपूर आणि योग्य वापर करू शकाल.लकी नंबर: 1, लकी कलर: पांढरा
advertisement
2/12
वृषभ - वृषभ राशीसाठी आज काही खास संधी चालून येतील. आपले विचार आणि भावना मांडण्यासाठी तुम्हाला योग्य वेळ मिळेल. जवळच्या व्यक्तींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे नात्यातली वीण घट्ट होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची हीच योग्य वेळ आहे. चौरस आहार आणि रोजचा व्यायाम तुम्हाला फायदेशीर ठरेल. आयुष्यात काही आव्हाने येतील, पण तुमच्या संयमामुळे तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकाल.लकी नंबर: 12, लकी कलर: नारंगी
advertisement
3/12
मिथुन - आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र अनुभवांचा असेल. तुमच्या बुद्धीचा आणि बोलण्याच्या कलेचा वापर करून तुम्ही लोकांच्या मनात घर कराल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचा मूड एकदम छान राहील. डोकं शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करा; योगा आणि ध्यानामुळे तुमची ऊर्जा टिकून राहील. सामाजिक वर्तुळ वाढवण्यासाठी आणि स्वतःचा समतोल राखण्यासाठी आज नवीन संधी मिळतील. सकारात्मक राहिलात तर प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल.लकी नंबर: 2, लकी कलर: मरून
advertisement
4/12
कर्क - तुमच्यासाठी आजचा दिवस खूपच पॉझिटिव्ह आणि एकमेकांना मदत करण्याचा असेल. आजूबाजूचे लोक तुमच्या भावना समजून घेतील, ज्यामुळे तुमचं काम आणि संवाद सोपा होईल. घरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी ही उत्तम वेळ आहे, यामुळे नात्यातलं प्रेम वाढेल. कामात तुमची कल्पकता दिसून येईल; एखाद्या नवीन प्रोजेक्टसाठी आज भारी आयडिया सुचू शकतात. स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी करा. आजचा दिवस प्रगतीचे संकेत देणारा आहे.लकी नंबर: 11, लकी कलर: लाल
advertisement
5/12
सिंह - आज तुम्ही उत्साहाने रसरसलेले असाल. तुमच्या सकारात्मक ऊर्जेने तुम्ही आजूबाजूच्या लोकांनाही खुश कराल. तुमच्या डोक्यात नवीन विचार फिरत असतील, तर तुमच्या प्लॅन्सवर काम करण्याची हीच योग्य वेळ आहे. योगामुळे मनाला शांती मिळेल. रोजच्या कामात थोडा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करा. आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जा. तुमच्यातला आत्मविश्वासच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. आजच्या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या.लकी नंबर: 3, लकी कलर: पिवळा
advertisement
6/12
कन्या - आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक संधी घेऊन येईल. तुमच्या कामाच्या पद्धतीत स्पष्टता आणि व्यवहार्यता दिसून येईल. बोलण्यातील गोडव्यामुळे तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुधारतील. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील, तरीही खर्चाच्या बाबतीत हात आखडता घ्या. तुमचे व्यावहारिक वागणे तुम्हाला आज आर्थिक बाबतीत मदत करेल. भावना ओळखून त्यांना योग्य दिशा द्या, तुम्हाला चांगले बदल पाहायला मिळतील.लकी नंबर: 10, लकी कलर: हिरवा
advertisement
7/12
तूळ - आजचा दिवस खूपच आनंददायी आणि सकारात्मक असेल. आजूबाजूच्या लोकांशी तुमचे सूत चांगलं जुळेल आणि सहकार्य मिळेल. विचारांमध्ये स्पष्टता असल्यामुळे तुम्ही ध्येयावर जास्त लक्ष देऊ शकाल. घरगुती आयुष्यात प्रेम आणि पाठिंबा मिळेल, ज्यामुळे नात्यातला गोडवा वाढेल. आज तुम्ही अगदी छोट्या कामातही आनंद शोधाल. छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला विसरू नका, कारण तेच सुखाचा पाया असतात.लकी नंबर: 4, लकी कलर: स्काय ब्लू
advertisement
8/12
वृश्चिक - आज तुमच्या आयुष्यात एक नवी ऊर्जा खेळताना दिसेल. डोकं पूर्वीपेक्षा जास्त शांत आणि स्पष्ट असल्यामुळे तुम्ही कामावर चांगलं लक्ष देऊ शकाल. जोडीदारासोबतचं नातं अधिक रोमँटिक आणि उबदार होईल. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. आज तुमचं मन जे सांगेल (इंट्यूशन) त्यावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. एखाद्या जुन्या मित्राशी किंवा जोडीदाराशी अचानक संपर्क होईल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल.लकी नंबर: 9, लकी कलर: गुलाबी
advertisement
9/12
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी आज नवीन शक्यतांचे दार उघडेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकाल. ऑफिसमध्ये काही नवीन संधी मिळतील, त्यामुळे तुमच्या आयडिया शेअर करायला मागे-पुढे पाहू नका. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक विचार करून पुढे जा. पैशांच्या बाबतीत थोडं सावध राहून गुंतवणूक केलेली बरी. आजचा दिवस उत्साहाचा आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या.लकी नंबर: 8, लकी कलर: गडद हिरवा
advertisement
10/12
मकर - आज तुमच्यासमोर काही आव्हानं उभी ठाकू शकतात, पण तुमचं नियोजन आणि चिकाटी तुम्हाला यशस्वी करेल. सहकाऱ्यांशी मोकळेपणाने बोला आणि गरज पडल्यास मदत मागायला संकोच करू नका. योगा आणि ध्यानाची मदत घेतल्यास तुमची ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. सामाजिक आयुष्यात नवीन ओळखी होतील, ज्या भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. स्वतःचं म्हणणं स्पष्टपणे मांडा, म्हणजे समोरच्याला तुमचं बोलणं नीट समजेल.लकी नंबर: 5, लकी कलर: निळा
advertisement
11/12
कुंभ - आजचा दिवस कुंभ राशीसाठी खूप साऱ्या नवीन संधी घेऊन येऊ शकतो. तुमच्या कल्पकतेसाठी तुमची ओळख निर्माण होईल, त्यामुळे तुमचे विचार नक्की मांडा. समाजात नवीन मित्र बनतील, जे तुम्हाला मानसिक आणि भावनिक आधार देतील. पैशांच्या बाबतीत लांबचा विचार करून गुंतवणूक करा; लगेच मिळणाऱ्या फायद्यापेक्षा भविष्याचा विचार करा. स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची हीच वेळ आहे, आपल्या इच्छा आणि ध्येयांचा पुन्हा विचार करा.लकी नंबर: 7, लकी कलर: काळा
advertisement
12/12
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी आज एक नवीन सुरुवात आहे. तुमच्या मानसिक स्थितीत चांगले बदल पाहायला मिळतील. आज तुमची संवेदनशीलता वाढेल, ज्यामुळे तुम्ही कुटुंब आणि मित्रांशी जवळचे नाते निर्माण करू शकाल. तुमचे छंद जोपासा आणि तुमच्यातल्या कलागुणांना वाव द्या. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने एकमेकांबद्दलची समज वाढेल. भावनेच्या भरात वाहून न जाता आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा.लकी नंबर: 6, लकी कलर: जांभळा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Today Horoscope: धूलिवंदनचा दिवस कोणासाठी भाग्याचा? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीभविष्य