TRENDING:

Malavya Rajyog: मालव्य राजयोगामुळे खात्यात येणार बक्कळ पैसा; या राशींच्या नशिबात अचानक धनलाभ

Last Updated:
Malavya Rajyog In Kundli : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे विशिष्ट कालावधीनंतर राशी परिवर्तन होते आणि त्यातून राजयोग तयार होतात. ज्याचा प्रभाव विविध राशींवर दिसून येतो. सुख-संपत्तीचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहाने 31 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे मालव्य राजयोग तयार झाला. सध्या सूर्यदेव मीन राशीत भ्रमण करत आहेत. त्यामुळे सूर्यदेवाचा शुक्राशी संयोग होईल. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी...
advertisement
1/6
मालव्य राजयोगामुळे खात्यात येणार बक्कळ पैसा; या राशींच्या नशिबात अचानक धनलाभ
मिथुन - मालव्य राजयोग तुमच्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. हा राजयोग मिथुन राशीच्या कर्म भावात तयार झालाय. शुक्र ग्रह हा तुमच्या राशीच्या पाचव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे जर तुम्ही कला, संगीत, फिल्म लाइन आणि अभिनयाशी निगडीत असाल तर या काळात तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतात.
advertisement
2/6
मिथुन - करिअर आणि व्यवसायातही चमक दिसून येईल. या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नती आणि वेतनवाढ देखील होऊ शकते. व्यावसायिकांना या काळात चांगला नफा होऊ शकतो.
advertisement
3/6
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग अनुकूल ठरू शकतो. कारण या राशीत सातव्या भावात मालव्य राजयोग तयार झालाय. तसेच शुक्र हा भाग्य आणि संपत्तीचा स्वामी आहे. त्यामुळे याकाळात नशीब तुमच्या पाठीशी असेल.
advertisement
4/6
कन्या - तुम्हाला जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन सुखी राहील. तसेच, याकाळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
advertisement
5/6
धनु - मालव्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चौथ्या भावात तयार होणार आहे. तुम्हाला भौतिक सुख मिळेल, तुम्ही मालमत्ता आणि वाहन घेऊ शकता.
advertisement
6/6
धनु - तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. या काळात प्रवासाची योजना आखू शकता. तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण यावेळी तुमचे आईसोबतचे नाते बिघडू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Malavya Rajyog: मालव्य राजयोगामुळे खात्यात येणार बक्कळ पैसा; या राशींच्या नशिबात अचानक धनलाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल