TRENDING:

Ganesh Chaturthi 2023: यंदाचा गणेशोत्सव या राशींसाठी विशेष लकी! बाप्पाच्या कृपेनं पूर्ण होतील साऱ्या इच्छा

Last Updated:
ganesh chaturthi 2023 horoscope: गणपती बाप्पाचा जन्मकाळ गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. यंदा गणेश चतुर्थी मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी आहे. यंदा गणेश चतुर्थी 6 राशीच्या लोकांसाठी नशीब बदलवणारी ठरू शकते. 6 राशीच्या लोकांवर गणपती बाप्पाची कृपा होईल आणि घर सुख-समृद्धीनं भरून जाईल. आयुष्यातील अडचणी आणि कामातील अडथळे दूर होतील. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांच्या मते, काही राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सव विशेष लाभदायी ठरेल. श्रीगणेशाच्या कृपेने जीवनात सर्व काही चांगलं होईल. जाणून घेऊया गणेश चतुर्थीचा कोणत्या 6 राशींवर काय सकारात्मक प्रभाव पडेल.
advertisement
1/6
गणेशोत्सव या राशींसाठी विशेष लकी! बाप्पाच्या कृपेनं पूर्ण होतील साऱ्या इच्छा
गणेश चतुर्थी 2023: 6 राशींचे भाग्य बदलेलमेष : गणेश चतुर्थीचा दिवस व्यवसायात लाभदायक ठरू शकतो. कामात फायदा होईल, ज्यामुळे आर्थिक क्षेत्र मजबूत होईल. या काळात तुमचे उत्पन्न चांगले राहील, पैशाची आवक चांगली राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करू शकता.
advertisement
2/6
सिंह: गणेश चतुर्थीच्या दिवशी या राशीच्या लोकांवर गणपती बाप्पाचा आशीर्वाद असेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल आणि त्यांची षड्यंत्रे अयशस्वी होतील. कामातील अडथळे दूर होतील आणि यश मिळेल. नवीन योजना सुरू करणे शुभ ठरेल. पैशाची कमतरता दूर होईल. आरोग्य चांगले राहील.
advertisement
3/6
कन्या : गणपती बाप्पा तुमच्या जीवनात मंगल गोष्टी आणेल. तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल, ज्यामुळे तुमची बँक शिल्लक वाढेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. तुमचा प्रभाव वाढेल. तुम्ही म्हणाल ते काम लोक पूर्ण करतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
advertisement
4/6
तूळ : गणेश चतुर्थीच्या काळात तुमचं मनोबल मजबूत असेल आणि तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल. चतुर्थी दिवशी तुम्ही काही नवीन काम कराल, ज्यामुळे तुमचे मन समाधानी होईल आणि आनंद मिळेल. तुमची संपत्ती वाढवण्याच्या योजनांवर तुम्ही काम करू शकता. गणेश चतुर्थीला घरात उत्सवाचे वातावरण असेल.
advertisement
5/6
धनु : गणेश चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. त्या दिवशी आर्थिक बाजू मजबूत होईल, मान-सन्मान वाढेल आणि अनेक क्षेत्रात लाभाच्या संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना नफा कमावण्याची संधी मिळेल. विवाहासाठी पात्र लोकांचे विवाह निश्चित केले जाऊ शकतात.
advertisement
6/6
मकर : व्यवसायाशी संबंधित लोकांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळेल. जुनी थकबाकी मिळाल्यानं भांडवल वाढेल. धन आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार लोकांना त्यांच्या बॉसचे सहकार्य मिळेल. ते तुमच्या कामावर खूश होतील. पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो. या दिवशी मित्रांना भेटून तुम्हाला आनंद होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Ganesh Chaturthi 2023: यंदाचा गणेशोत्सव या राशींसाठी विशेष लकी! बाप्पाच्या कृपेनं पूर्ण होतील साऱ्या इच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल