महाशिवरात्रीनंतर ग्रहणाचं सावट, 3 राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी; कठोर परीक्षेचा ठरणार काळ!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
फेब्रुवारी 2026 मधील महाशिवरात्रीचा उत्सव संपताच अवकाशात एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. यावर्षी महाशिवरात्रीनंतर लगेचच सूर्यग्रहणाचे सावट पाहायला मिळणार आहे.
advertisement
1/7

फेब्रुवारी 2026 मधील महाशिवरात्रीचा उत्सव संपताच अवकाशात एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. यावर्षी महाशिवरात्रीनंतर लगेचच सूर्यग्रहणाचे सावट पाहायला मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शिवरात्रीच्या पवित्र काळानंतर होणारे हे ग्रहण अत्यंत प्रभावशाली असून, त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे.
advertisement
2/7
हे ग्रहण राहू आणि केतूच्या प्रभावाखाली असल्याने विशेषतः 3 राशींसाठी हा काळ परीक्षेचा ठरू शकतो. ग्रहणाच्या या काळात नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असल्याने काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
3/7
कुंभ - स्वतःच्या राशीत ग्रहण: हे सूर्यग्रहण तुमच्याच राशीत होत आहे. सूर्य हा आत्मविश्वासाचा कारक आहे आणि तो राहू-केतूच्या प्रभावाखाली आल्याने तुमच्यात गोंधळ वाढू शकतो. या काळात तुम्हाला अनिर्णयता आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. घाईत घेतलेले आर्थिक निर्णय मोठे नुकसान करू शकतात. या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा आणि डोके शांत ठेवण्यासाठी ध्यान करा.
advertisement
4/7
सिंह - सप्तम भावात परिणाम: तुमच्या राशीचा स्वामी स्वतः सूर्य आहे. सिंह राशीच्या कुंडलीत हे ग्रहण सातव्या घरात होत आहे. जोडीदारासोबत विनाकारण खटके उडू शकतात. भागीदारीत व्यवसाय करत असाल, तर गैरसमज वाढण्याची दाट शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची आणि त्यांच्या भावनांची विशेष काळजी घ्या. संवादात स्पष्टता ठेवा.
advertisement
5/7
वृश्चिक - चतुर्थ भावात परिणाम: तुमच्या राशीसाठी हे ग्रहण चौथ्या घरात लागत आहे. तसेच कामाच्या ठिकाणी ग्रहांची स्थिती थोडी प्रतिकूल आहे. कामाच्या ठिकाणी राजकारण किंवा षडयंत्राला सामोरे जावे लागू शकते. घरातील शांतता भंग होण्याची आणि वाहन किंवा मालमत्तेबाबत समस्या येण्याची शक्यता आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमची गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नका.
advertisement
6/7
नवीन कामाची सुरुवात टाळा: ग्रहणाचे वेध लागल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत कोणतेही नवीन काम, व्यापार किंवा महत्त्वाचे करार करू नका. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात नुकसानकारक ठरू शकतात.
advertisement
7/7
वादापासून दूर राहा: ग्रहणामुळे मानवी स्वभावात चिडचिडेपणा वाढतो. विशेषतः कौटुंबिक किंवा कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद घालणे टाळा, अन्यथा संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण होऊ शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
महाशिवरात्रीनंतर ग्रहणाचं सावट, 3 राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी; कठोर परीक्षेचा ठरणार काळ!