TRENDING:

Astrology: गजलक्ष्मी राजयोग जुळलाय! या राशींचे आता नशीब उजळणार, गुरुचा उदय अपार संपत्ती-सुख देणार

Last Updated:
Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. जवळपास १२ वर्षांनी मिथुन राशीत गुरू ग्रहाचा उदय होणार आहे. यामुळे गुरू आणि शुक्र ग्रहाची युती होईल. त्यातून गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
advertisement
1/6
गजलक्ष्मी राजयोग! या राशींचे आता नशीब उजळणार, गुरुचा उदय अपार संपत्ती-सुख देणार
राशीचक्रातील ३ राशी या ग्रहस्थितीमुळे भाग्यवान ठरणार आहेत, या राशीच्या लोकांना या काळात चांगला आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
2/6
कन्या - गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीच्या दहाव्या घरात गुरु ग्रहाची निर्मिती होणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
advertisement
3/6
कन्या - या काळात जीवनात सुखसोयी आणि सुविधा वाढतील कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच, या काळात तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले नाते अधिक दृढ होईल.
advertisement
4/6
सिंह - गजलक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभ स्थानात गुरु आणि शुक्र यांचा संयोग होणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल.
advertisement
5/6
सिंह - तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला लवकरच चांगली संधी मिळू शकते. तसेच, यावेळी, तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
तूळ - गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा राजयोग तुमच्या राशीच्या भाग्य स्थानात तयार होईल. त्यामुळे याकाळाक तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तसेच, तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तिथे तुम्ही देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. जर तुम्ही कोणत्याही सर्जनशील कामात सहभागी असाल तर तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातही चांगले निकाल मिळतील. तसेच, यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: गजलक्ष्मी राजयोग जुळलाय! या राशींचे आता नशीब उजळणार, गुरुचा उदय अपार संपत्ती-सुख देणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल