"समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा..." खरातची काळी कृत्य पाहून संतापला 'हास्यजत्रा' फेम अभिनेता, सुनावले खडे बोल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ashok Kharat Case: सध्या खरात पोलीस कोठडीत असला, तरीही त्यांच्या कृत्यांबद्दल सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. कलाविश्वातही याचे पडसाद उमटले असून अनेकांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
1/11

सध्या अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राला नाही, तर संपूर्ण देशाला हादरवलं आहे. नाशिकचा कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या विकृत कृत्यांनी सध्या सर्वांना धडकी भरवली असून श्रद्धेच्या नावाखाली त्याने केलेल्या कृत्यांचा आता पर्दाफाश झाला आहे.
advertisement
2/11
सध्या खरात पोलीस कोठडीत असला, तरीही त्यांच्या कृत्यांबद्दल सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. कलाविश्वातही याचे पडसाद उमटले असून अनेकांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
3/11
याआधी दिग्गज अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी लिहिलं होतं, "हे लोक पकडले गेले तरच 'भोंदू' ठरतात, पण त्याआधी ते कोण असतात?"
advertisement
4/11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही अतिशय लहान, पण तितक्याच प्रभावी पोस्टमधून खरातचा समाचार घेतला आहे. 'प्रयत्ने चिंचोणी घासता, लाखही मिळे…' असं सचिन गोस्वामी यांनी म्हटलं होतं.
advertisement
5/11
अशातच, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता आणि लेखक श्रमेश बेटकर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट समाजाला आरसा दाखवला आहे.
advertisement
6/11
श्रमेश अनेकदा सोशल मीडियावर त्याची परखड मते शेअर करत असतो. आता अशोक खरात प्रकरणावरही श्रमेशने अतिशय रोखठोक मत मांडलं आहे. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये श्रमेशने खरातसोबतच समाजावरही ताशेरे ओढले आहेत.
advertisement
7/11
श्रमेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'साप म्हटलं की तो चावणारच. त्यामुळे समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा आपण आपला मेंदू गहाण का ठेवतो? आपण स्वत:ला गंडवून का घेतो? याचा शोध घेणे गरजेचे आहे.'
advertisement
8/11
श्रमेशने आपल्या पोस्टमधून खरातसोबतच समाजही काही अंशी दोषी असल्याचं म्हटलं आहे. भोंदूबाबांना दोष देण्यापेक्षा, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आपण आपली विचार करण्याची शक्ती का गमावतो, असा रोखठोक प्रश्न त्याने विचारला आहे.
advertisement
9/11
दरम्यान, अशोक खरातला सध्या २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष तपास पथक या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून, आतापर्यंत समोर आलेली माहितीनुसार, खरातच्या ताब्यातून तब्बल ५८ अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. यात तो भोंदूगिरी आणि तंत्रमंत्राचा धाक दाखवून महिलांवर अत्याचार करताना दिसत आहे.
advertisement
10/11
आतापर्यंत ८ महिलांनी धैर्याने समोर येऊन खरातच्या विरोधात तक्रार नोंदवत जबाब दिला आहे. यामध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश असून, तिच्यावरही या नराधमाने लैंगिक अत्याचार केले होते.
advertisement
11/11
महत्त्वाची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, खरातचे अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर येत असल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनलं आहे. अशातच आता हे प्रकरण कोणते वळण घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा..." खरातची काळी कृत्य पाहून संतापला 'हास्यजत्रा' फेम अभिनेता, सुनावले खडे बोल