TRENDING:

मुलीच्या शिक्षण,लग्नाची चिंता सोडा! २१ व्या वर्षापर्यंत मिळतील ४६ लाख रुपये, सरकारची योजना आहे तरी काय?

Last Updated:
Sukanya Smaruddhi Yojana : मुलींच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केंद्रासह विविध राज्य सरकारांकडून अनेक बचत योजना राबवल्या जात आहेत.
advertisement
1/6
मुलीच्या शिक्षण,लग्नाची चिंता सोडा! २१ व्या वर्षापर्यंत मिळतील ४६ लाख रुपये, सरकारची योजना आहे तरी काय?
मुलींच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केंद्रासह विविध राज्य सरकारांकडून अनेक बचत योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना ही सर्वात लोकप्रिय आणि लाभदायक योजना मानली जाते. या योजनेची सुरुवात 2015 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात करण्यात आली होती.
advertisement
2/6
या योजनेअंतर्गत सध्या सुमारे 8.2 टक्के व्याजदर दिला जात असून, इतर बचत योजनांच्या तुलनेत हा दर अधिक मानला जातो. विशेष म्हणजे, या योजनेतून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे. म्हणजेच गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावर कोणताही कर भरावा लागत नाही.
advertisement
3/6
या योजनेत केवळ 10 वर्षांखालील मुलीच्या नावाने खाते उघडता येते. दरवर्षी किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक असून, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
advertisement
4/6
या योजनेत 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी ते परिपक्व (मॅच्युर) होते. मात्र, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी खाते बंद करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. अशावेळी संपूर्ण रक्कम मुलीच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.
advertisement
5/6
या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींची खाती उघडता येतात. मात्र जुळ्या मुली असल्यास हा नियम शिथिल करण्यात आला आहे. खाते देशातील कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते.
advertisement
6/6
उदाहरणार्थ, मुलीचे वय 1 वर्ष असताना खाते उघडून दरवर्षी 1 लाख रुपये गुंतवले, तर 21 वर्षांनंतर सुमारे 46 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते. यासाठी दरमहा सुमारे 8,334 रुपयांची बचत करावी लागते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुलीच्या शिक्षण,लग्नाची चिंता सोडा! २१ व्या वर्षापर्यंत मिळतील ४६ लाख रुपये, सरकारची योजना आहे तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल