Shani Sade Sati: हत्ती गेला शेपूट राहिली! साडेसातीचा शेवटचा टप्पा उरलाय, या उपायांनी चांगलेच परिणाम होतील
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani SadeSati Upay: ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा क्रूर ग्रह मानला जातो. शनिदेवाला न्यायाधीश असेही म्हटले जाते, कारण शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनिची साडेसाती, धैय्या किंवा महादशा असते तेव्हा लोकांना शनी कष्ट दाखवतात. शनिची कृपा असते तेव्हा व्यक्तीचे भाग्य उजळते.
advertisement
1/6

सध्या २०२५ मध्ये मेष, कुंभ आणि मीन राशी शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत. पण, साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभ राशीवर आहे आणि साडेसातीचा पहिला टप्पा मेष राशीवर सुरू झालाय. मीन राशीवर दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
advertisement
2/6
कुंभ राशीचे लोक बऱ्याच काळापासून शनीच्या प्रकोपाने त्रस्त आहेत. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार डॉ. अरविंद पचौरी यांनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात दिलासा मिळवू देणाऱ्या उपायांबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
advertisement
3/6
साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय -ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांना ०३ जून २०२७ रोजी शनीच्या साडेसातीतून सुटका मिळेल. या दिवशी शनिदेव आपली राशी बदलतील आणि मीन राशीतून मेष राशीत संक्रमण करतील. या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांवर साडेसातीची सुरुवात होईल तर कुंभ राशीच्या लोकांना सुटका मिळेल. यासोबतच सिंह आणि धनु राशीच्या लोकांना शनीच्या धैय्यापासून आराम मिळेल.
advertisement
4/6
शनिदेवाचा आशीर्वाद कसा मिळेल -भगवान शनिदेव हे कुंभ राशीचे स्वामी आहेत, म्हणून तुम्हाला शनीची वक्रदृष्टी टाळायची असेल तर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायला सुरुवात करा, त्यामुळे दिलासा मिळेल.
advertisement
5/6
याशिवाय कुंभ राशीत जन्मलेल्या लोकांनी शनिवारी काळे तीळ, मोहरीचे तेल, ब्लँकेट, चामड्याचे बूट आणि चप्पल इत्यादी गरजूंना दान करावे. तुम्हाला करिअरशी संबंधित फायदे नक्कीच मिळतील.
advertisement
6/6
कुंभ राशीत जन्मलेल्या लोकांनी शनीच्या साडेसातीच्या काळात शंकराची पूजा करावी. दररोज शिवलिंगावर पाणी अर्पण करावे, शनिच्या साडेसातीमध्ये तुम्हाला लाभ होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Sade Sati: हत्ती गेला शेपूट राहिली! साडेसातीचा शेवटचा टप्पा उरलाय, या उपायांनी चांगलेच परिणाम होतील