Astrology: नशीब चमकणार! सप्टेंबर महिन्यात या राशींना खुशखबर; डबल फायदा, कार्यक्षेत्र गाजवणार
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशिपरिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. भविष्यकथनावेळी ग्रहांचं गोचर हा महत्त्वाचा घटक ठरतो. प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशिपरिवर्तन करत असतो. लवकरच ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर सुरू होणार आहे. सप्टेंबर महिन्यात बुध आणि गुरू हे दोन महत्त्वाचे ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. याचा परिणाम सर्वच राशींवर दिसेल; पण बुध, गुरूचं हे परिवर्तन तीन राशींसाठी खास फलदायी ठरेल. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
1/5

बुध हा वाणी, बुद्धी, व्यापाराचा कारक मानला जातो. गुरू हा ग्रह शिक्षण, संतती, भाग्यकारक मानला जातो. सप्टेंबर महिन्यात हे दोन्ही ग्रह एकाच दिवशी गोचर करणार आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत बुध प्रबळ असतो, त्या व्यक्तींना जीवनात यश मिळते. तसंच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरू प्रबळ असेल तर त्या उत्तम शिक्षण घेतात. या व्यक्तींना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळते. तसंच त्यांची जीवनातल्या समस्यांमधून लगेच सुटका होते.
advertisement
2/5
ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि गुरू 22 सप्टेंबर रोजी राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतील. रविवारी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी बुध कन्या राशीत प्रवेश करील. याच दिवशी सायंकाळी सात वाजून 14 मिनिटांनी गुरू मृग नक्षत्रात गोचर करील. यामुळे काही राशींना विशेष शुभ फळ मिळेल.
advertisement
3/5
मेष : ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि गुरूचं गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष लाभदायक असेल. नोकरदार व्यक्तींची सर्व कामं वेळेत पूर्ण होतील. ऑफिसमध्ये त्यांच्या कामाचं कौतुक होईल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मान-सन्मान मिळेल. तरुणांची धर्म, अध्यात्मात रुची वाढेल. मानसिक शांती लाभेल.
advertisement
4/5
कन्या : या राशीच्या अविवाहित व्यक्तींना मित्रांकडून सहकार्य मिळेल. रखडलेली कामं पूर्ण होतील. 22 सप्टेंबरपूर्वी बेरोजगार असलेल्या व्यक्तींना नोकरी मिळू शकते.गुंतवणुकीसाठी कालावधी चांगला आहे. यातून भविष्यात चांगला लाभ मिळेल. विवाहित व्यक्ती आणि रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींचे जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील.
advertisement
5/5
मकर : ज्योतिषशास्त्रानुसार व्यावसायिकांची रखडलेली कामं या कालावधीत पूर्ण होतील. तरुण एखाद्या आजारानं त्रस्त असतील तर 22 सप्टेंबरपर्यंत त्यांना आजारातून मुक्ती मिळेल. नोकरदार व्यक्तींना अचानक धनलाभ होईल. त्यामुळे ते आनंदी असतील. याशिवाय कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचा विवाह निश्चित होऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: नशीब चमकणार! सप्टेंबर महिन्यात या राशींना खुशखबर; डबल फायदा, कार्यक्षेत्र गाजवणार