TRENDING:

Mahalaxmi Rajyog 2026: कधी केव्हाची गोष्ट अनपेक्षित फळ देणार! 3 राशींचे लोक आनंदाने उड्या मारतील, धनवर्षा

Last Updated:
Mahalaxmi Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रात काही खास योग जुळून येतात, त्याचा राशीचक्रावर मोठा परिणाम दिसतो. दिनांक 16 मार्च 2026 ही तारीख ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तुमच्या नशिबाला कलाटणी देणारी ठरू शकते. पंचांगानुसार, या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगळ आणि मनाचा कारक असलेला चंद्र हे दोन्ही एकत्र येऊन महालक्ष्मी राजयोग तयार करत आहेत. ज्योतिषशास्त्रात या योगाला धन आणि ऐश्वर्याचं सर्वात मोठं प्रतीक मानलं जातं. या योगाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार असला तरी, 3 राशींना अक्षरशः लॉटरी लागणार आहे.
advertisement
1/5
कधी केव्हाची गोष्ट अनपेक्षित फळ देणार! 3 राशींचे लोक आनंदाने उड्या मारतील
महालक्ष्मी राजयोग म्हणजे काय?जेव्हा पत्रिकेत मंगळ आणि चंद्र एकमेकांसोबत केंद्र किंवा त्रिकोण भावात असतात किंवा एकमेकांवर शुभ दृष्टी टाकतात, तेव्हा महालक्ष्मी राजयोग तयार होतो. मंगळ हा साहस, ऊर्जा आणि जमिनीचा कारक आहे, तर चंद्र हा मन, शीतलता आणि पैशांच्या ओघाचा कारक आहे. जेव्हा या दोन ग्रहांची शक्ती एकत्र येते, तेव्हा माणसाला केवळ आर्थिक फायदाच होत नाही, तर समाजात मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठाही मिळते.
advertisement
2/5
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग एखाद्या वरदानासारखाच आहे. जर तुम्ही पूर्वी कुठे गुंतवणूक केली असेल, तर त्यातून आता मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना बॉसकडून कौतुकाची थाप आणि पगारवाढीची गोड बातमी मिळू शकते. तुमची रखडलेली कामं आता सुसाट वेगाने पूर्ण होतील. नवीन घर किंवा गाडी घेण्याचा तुमचा विचार असेल, तर त्यासाठी ही वेळ अगदी योग्य आहे.
advertisement
3/5
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि चंद्राची ही जोडी करिअरमध्ये यशाची शिखरं गाठून देईल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांना एखादी मोठी आणि फायदेशीर डील मिळू शकते. तुमची आर्थिक बाजू आधीपेक्षा खूप जास्त मजबूत होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातला कटकटीचा आणि तणावाचा काळ संपून शांतता येईल. मित्रांच्या मदतीने तुमचे रखडलेले प्रोजेक्ट्स पुन्हा सुरू होतील.
advertisement
4/5
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रोफेशनल लाइफमधील 'गोल्डन पिरीयड' ठरणार आहे. समाजात तुमचा दरारा आणि रुतबा वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. जर तुमचा एखादा जुना वाद किंवा कायदेशीर कटकट सुरू असेल, तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
वृश्चिक व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज हवं असेल, तर ते सहजासहजी मंजूर होईल. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता तुमच्याकडे पैसा टिकायला सुरुवात होईल. या राजयोगाचा पूर्ण फायदा करून घेण्यासाठी 16 मार्च रोजी महालक्ष्मीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि 'ॐ महालक्ष्म्यै नमः' या मंत्राचा जप करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mahalaxmi Rajyog 2026: कधी केव्हाची गोष्ट अनपेक्षित फळ देणार! 3 राशींचे लोक आनंदाने उड्या मारतील, धनवर्षा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल