आज माघी गणपती! बाप्पाचा आशीर्वाद 'या' 5 राशींवर बरसणार; शुभं दिवशी होणार जबरदस्त फायदा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आज देशभरात माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच 'माघी गणेश जयंती' साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज 'रवि योग' आणि 'शुभ योग' असा दुर्मिळ संयोग जुळून आला आहे.
advertisement
1/6

आज देशभरात माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच 'माघी गणेश जयंती' साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज 'रवि योग' आणि 'शुभ योग' असा दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी ग्रहांची ही स्थिती काही विशिष्ट राशींसाठी भाग्योदयाची ठरणार आहे.
advertisement
2/6
मेष: कामात यश आणि प्रगती मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस यशाचा असेल. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी मिळू शकते.
advertisement
3/6
मिथुन: अचानक धनलाभ मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभ घेऊन आला आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायात मोठे सौदे फायदेशीर ठरतील आणि तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल.
advertisement
4/6
कन्या: कौटुंबिक सौख्य कन्या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आनंदाचा राहील. कुटुंबात सुरू असलेले मतभेद संपतील. बाप्पाच्या कृपेने घरात नवीन वस्तूची खरेदी होऊ शकते. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील.
advertisement
5/6
वृश्चिक: नवीन संधी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन नोकरी किंवा व्यवसायाचे मार्ग मोकळे होतील. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल आणि मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
कुंभ: मान-प्रतिष्ठेत वाढ कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा 'रवि योग' फायदेशीर ठरेल. समाजात तुमची प्रतिमा सुधारेल. दीर्घकाळापासून सतावणारा मानसिक तणाव दूर होईल आणि नवीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आज माघी गणपती! बाप्पाचा आशीर्वाद 'या' 5 राशींवर बरसणार; शुभं दिवशी होणार जबरदस्त फायदा