TRENDING:

Angarak Yog 2026: आता चुकीला माफी नाही, कामात कुचराई येईल अंगलट; अंगारक योगात या राशींना अलर्ट

Last Updated:
Astrology Effective 2026: ज्योतिषीय चक्रानुसार काही घातक योग ग्रहांच्या स्थितीमुळे निर्माण होत असतात. त्यानुसार कुंभ राशीमध्ये दिनांक 2 एप्रिल 2026 पर्यंत अंगारक योग राहणार आहे. ज्योतिषशास्त्रात या योगाला खूप कडक आणि प्रभावी मानलं जातं. या काळात माणसाची विचार करण्याची शक्ती थोडी कमी होते आणि घाईघाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. विनाकारण वाद होणं, कामात अडथळे येणं किंवा नात्यात ताण निर्माण होणं असे प्रकार या काळात घडू शकतात.
advertisement
1/6
आता चुकीला माफी नाही, कामात कुचराई येईल अंगलट; अंगारक योगात या राशींना अलर्ट
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा धडधड वाढवणारा असू शकतो. आयुष्यात अचानक काही बदल घडतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, कारण जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
कर्क - ऑफिसमध्ये आपल्या कामाशी काम ठेवा, कोणाच्याही फंदात पडू नका, तुमचे गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. गुंतवणूक करताना रिस्क घेऊ नका आणि गाडी चालवताना आपलं पूर्ण लक्ष रस्त्यावरच ठेवा.
advertisement
3/6
धनू - धनू राशीच्या मंडळींनी या काळात आपल्या जिभेवर ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमच्या बोलण्यातला कडवटपणा समोरच्याला दुखावू शकतो आणि त्यातून मोठे वाद निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत हा काळ थोडा ओढाताणीचा असेल, त्यामुळे कोणालाही उसने पैसे देऊ नका किंवा घेऊ नका. खर्चाचं गणित थोडं बिघडू शकतं. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवला तर मोठं नुकसान सहन करावं लागेल, त्यामुळे सावध राहा.
advertisement
4/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा अंगारक अडचणीचा ठरेल. तुमची चांगली सुरळीत चाललेली कामं शेवटच्या क्षणी अडकू शकतात. 2 एप्रिलपर्यंत तरी कोणताही नवीन व्यवहार किंवा गुंतवणूक टाळलेली बरी, नाहीतर तुमचे पैसे अडकून पडतील.
advertisement
5/6
मिथुन - कोणतंही काम करताना घाई करू नका, आधी सगळी माहिती घ्या आणि मगच पाऊल टाका. या काळात थोडा संयम पाळला तरच तुम्ही होणाऱ्या त्रासातून वाचू शकाल.
advertisement
6/6
कुंभ - तुमच्याच राशीत हा योग असल्यामुळे तुमचा स्वभाव थोडा चिडचिडा होऊ शकतो. किरकोळ कारणावरून राग आल्यामुळे घरामध्ये, विशेषतः जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता आहे. तुमचं एक चुकीचं वाक्य रिलेशनमध्ये गैरसमज निर्माण करू शकतं. आरोग्याच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करू नका. जास्त नफ्याच्या मोहात पडून कुठेही गुंतवणूक करू नका, कारण लालसा तुम्हाला खड्ड्यात टाकू शकतं. शांत राहणं हाच यावरचा उत्तम उपाय आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Angarak Yog 2026: आता चुकीला माफी नाही, कामात कुचराई येईल अंगलट; अंगारक योगात या राशींना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल