Magh Purnima 2026: माघी पौर्णिमेचा चंद्र सुख मिळू देणार नाही; 4 राशींना रेड अलर्ट, खडतर काळातून प्रवास
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Magh Purnima 2026 Rashifal: Magh Purnima 2026: यंदाची माघी पौर्णिमा 1 फेब्रुवारी, रविवार या दिवशी येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण कलांनी उजळलेला असतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो, त्यामुळे या दिवशी भावनांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. वृषभ राशीसह आणखी चार राशींच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिक, मानसिक आणि आरोग्याच्या बाबतीत थोडा त्रासदायक ठरू शकतो. कोणत्या राशीला कोणत्या अडचणी येऊ शकतात, ते सविस्तर पाहूया.
advertisement
1/6

माघ पौर्णिमेच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांसोबत एखादी अनपेक्षित गोष्ट घडू शकते. ती घटना स्वीकारणं किंवा पचवणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. हा अनुभव काहीसा कडू ठरू शकतो. या दिवशी मन मजबूत ठेवा, कारण जास्त भावनिक झाल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. जुन्या आठवणी किंवा गोष्टी मनातून काढून टाकून पुढे जाणंच तुमच्यासाठी चांगलं ठरेल.
advertisement
2/6
वृषभेच्या लोकांनी कामाशी संबंधित गोष्टी गोपनीय ठेवा आणि कोणाशीही महत्त्वाची माहिती शेअर करू नका, नाहीतर कामात अडथळे येऊ शकतात. कोणासोबतही भागीदारी करण्याआधी नीट विचार करूनच निर्णय घ्या.
advertisement
3/6
कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या भावनांवर जास्त नियंत्रण ठेवावं लागेल. या दिवशी कुणावरही राग काढू नका आणि लोकांशी शांत, सौम्य शब्दांत बोला. वादविवादाच्या प्रसंगांपासून लांब राहिलेलंच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचा स्वभाव थोडा उग्र होऊ शकतो आणि नकळत तुम्ही इतरांची थट्टा करू शकता, जी पुढे जाऊन तुमच्यासाठी अडचणीची ठरू शकते. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या आणि लोक काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा. गुंतवणुकीच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेणं टाळलेलं बरं.
advertisement
4/6
सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस विशेष काळजी घेण्याचा आहे. प्रेमसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक आयुष्यात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत झालेल्या वादामुळे नात्यातला विश्वास डळमळीत होऊ शकतो. जुनी न्यायालयीन प्रकरणं असतील तर त्यामध्ये अडचणी वाढू शकतात, ज्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होईल.
advertisement
5/6
सिंह राशीचे जे लोक अजून अविवाहित आहेत, त्यांना लग्नाबाबतच्या चिंतेमुळे तणाव जाणवू शकतो. वाईट संगतीपासून दूर राहणं फार महत्त्वाचं आहे. अगदी छोट्या गोष्टींनाही प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नका, नाहीतर समाजात मान-सन्मान कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
मीन राशीच्या लोकांनी या दिवशी करिअर आणि वैवाहिक आयुष्याबाबत विशेष सावध राहणं गरजेचं आहे. जोडीदार नाराज असल्यास त्याचा ताण तुमच्यावर येऊ शकतो, त्यामुळे त्यांना वेळ देण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये योग्य समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे. मनात भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि रागही वाढू शकतो. अशा वेळी ध्यान, प्राणायाम किंवा योगासने करणं उपयोगाचं ठरेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या पक्षपाती वागणुकीमुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गॉसिपपासून दूर राहा आणि फक्त स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Magh Purnima 2026: माघी पौर्णिमेचा चंद्र सुख मिळू देणार नाही; 4 राशींना रेड अलर्ट, खडतर काळातून प्रवास