Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; संकटांपासून लगेच पळ काढण्यापेक्षा..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope Marathi: मार्च महिन्याचा पहिला आठवडा काही राशींना जास्त त्रासाचा ठरू शकतो, चांगल्या गोष्टी कमी आणि अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राशीचक्रातील शेवटच्या 4 राशींना आठवडा कसा असेल याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/7

धनु - धनु राशीसाठी हा आठवडा चढ-उतारांचा असेल. कामातली आव्हानं ओळखायला तुम्ही कमी पडू शकता, ज्यामुळे काही अडचणी उभ्या राहतील. आठवड्याच्या सुरुवातीला अचानक आलेले खर्च आणि जुनी देणी यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकतं. नोकरी करणाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी मशीनसारखं काम करावं लागेल, ज्यामुळे खूप थकवा येईल.
advertisement
2/7
धनू - कुणाच्याही वादात पडू नका, शांत राहणं चांगलं ठरेल. व्यवसायात रिस्क घेण्याची ही वेळ नाही, मार्केटचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या. पण उत्तरार्धात हुशारीने एखादा व्यवहार केलात तर चांगला नफा मिळू शकतो. वैयक्तिक नात्यात समोरच्याचं ऐकून घ्या. जोडीदाराची साथ तुम्हाला बळ देईल.लकी कलर: निळा, लकी नंबर: 9
advertisement
3/7
मकर - मकर राशीसाठी हा आठवडा थोडा अस्थिर असेल. नोकरीत अचानक कामाचा बोजा वाढेल, जो पूर्ण करण्यासाठी खूप कसरत करावी लागेल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्यामुळे मन उदास होईल. उच्च शिक्षणाची स्वप्नं पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडी अजून वाट पाहावी लागेल.
advertisement
4/7
मकर - आठवड्याच्या सुरुवातीला मालमत्तेवरून घरात कटकटी होऊ शकतात. मुलं किंवा जोडीदाराच्या वागण्यामुळे तुमची चिंता वाढेल. संकटांपासून पळ काढण्यापेक्षा त्यांना सामोरं जा, कारण जबाबदाऱ्या टाळून चालणार नाही. नातेवाईकांशी बोलताना जपून बोला. प्रेमाची कबुली द्यायची असेल तर घाई करू नका, योग्य वेळेची वाट पाहा.लकी कलर: गुलाबी, लकी नंबर: 4
advertisement
5/7
कुंभ - कुंभ राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा असेल. कामाच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. सुरुवातीला थोडा खर्च वाढेल, पण पैशांची आवकही चांगली राहील. जमीन खरेदी किंवा विक्रीची तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते, फक्त कागदपत्रं नीट तपासा. कामाच्या ठिकाणी खोटं बोलणं किंवा नियम मोडणं टाळा, नाहीतर बदनामी होऊ शकते.
advertisement
6/7
कुंभ - नोकरी बदलण्याचा विचार असेल तर भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. वैयक्तिक नात्यात घरच्यांच्या काही तक्रारी असू शकतात. प्रेमात उतावीळपणा करू नका. वैवाहिक सुख जपण्यासाठी जोडीदाराला थोडा निवांत वेळ द्या.लकी कलर: लाल, लकी नंबर: 7
advertisement
7/7
मीन - मीन राशीसाठी हा आठवडा अतिशय शुभ आहे. तुम्हाला घरून आणि बाहेरूनही मोठा पाठिंबा मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांची तुमच्यावर मेहेरनजर असेल आणि एखादी मोठी जबाबदारी किंवा पद तुम्हाला मिळू शकतं. लेखन, पत्रकारिता किंवा रिसर्च क्षेत्रात असणाऱ्यांचा समाजात मान वाढेल. व्यवसायाचा विस्तार होईल आणि नफा वाढल्यामुळे रोजचं उत्पन्न सुधारेल. परदेशात जाण्याची किंवा तिथे शिकण्याची तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. घरात एखादं धार्मिक किंवा मंगल कार्य घडेल. लग्नाचे योग जुळून येतील आणि प्रेमसंबंधांत गोडवा राहील. वैवाहिक जीवन खूप छान असेल.लकी कलर: पांढरा, लकी नंबर: 8
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; संकटांपासून लगेच पळ काढण्यापेक्षा..