TRENDING:

संघर्ष संपला! चंद्राची कृपा, आजपासून या राशींचे लोक धनवान होणार, वाचा राशीभविष्य

Last Updated:
Astrology News : आज सकाळी चंद्राचे पूर्वाषाढा नक्षत्रातील संक्रमण अनेक राशींवर शुभ परिणाम घडवून आणणारे ठरत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 9 जुलै रोजी पहाटे 3:14 वाजता चंद्र वृश्चिक राशी सोडून धनु राशीत प्रवेश करत 11 जुलै दुपारी 12:08 वाजेपर्यंत तिथे राहणार आहे.
advertisement
1/5
संघर्ष संपला! चंद्राची कृपा, आजपासून या राशींचे लोक धनवान होणार, वाचा राशीभविष्य
आज सकाळी चंद्राचे पूर्वाषाढा नक्षत्रातील संक्रमण अनेक राशींवर शुभ परिणाम घडवून आणणारे ठरत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 9 जुलै रोजी पहाटे 3:14 वाजता चंद्र वृश्चिक राशी सोडून धनु राशीत प्रवेश करत 11 जुलै दुपारी 12:08 वाजेपर्यंत तिथे राहणार आहे. विशेषतः आज पहाटे 4:49 वाजता चंद्राचा प्रवास पूर्वाषाढा नक्षत्रात झाला आणि याचा प्रभाव विशेषतः तीन राशींवर सकारात्मक ठरणार आहे.
advertisement
2/5
<strong> कर्क - </strong>  कर्क राशीसाठी चंद्र संक्रमण अत्यंत शुभदायक आहे. यामागील कारण म्हणजे कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्रला ही रास अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे आजच्या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबीयांमध्ये प्रेमभावना वाढेल, तसेच अडचणी असलेल्या नातेसंबंधात सुधारणा होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सरकारी संस्थांमध्ये संधी मिळू शकते. आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना नवी दिशा मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले एकाग्रता लाभेल.
advertisement
3/5
<strong>कन्या -</strong> कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आणि निर्णयक्षमतेसाठी उत्तम आहे. तुमचे गणिती विचार, काटेकोर नियोजन आणि संयमाचा वापर व्यवसायात सकारात्मक परिणाम देईल. भागीदारीत व्यवसाय करत असाल, तर आज महत्त्वाचे निर्णय घ्यायला उत्तम वेळ आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या मेहनतीचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमची दखल घेतील. नातेसंबंधांमध्ये अहंकार टाळावा आणि संवादावर लक्ष द्यावे. संवादामधूनच समस्यांचे निराकरण होईल.
advertisement
4/5
<strong>वृश्चिक -</strong>   वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस नवा उत्साह घेऊन येणार आहे. चंद्राच्या संक्रमणामुळे तुमच्यावर सकारात्मक उर्जा प्रभावी होईल, विशेषतः नोकरी करत असलेल्या लोकांसाठी. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल, जे तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून खूप उपयुक्त ठरू शकतात. विवाहित लोकांसाठी संयम आणि संवाद कौशल्य महत्त्वाचे ठरणार आहे. तुमचं संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढणार आहे, ज्याचा उपयोग तुम्ही सामाजिक व व्यावसायिक जीवनात करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी देखील आजचा दिवस संधी घेऊन आलेला आहे.
advertisement
5/5
10 जुलै रोजी झालेल्या चंद्र संक्रमणाचा सर्वसामान्यांवर सौम्य प्रभाव असला तरी कर्क, कन्या आणि वृश्चिक या राशींसाठी आजचा दिवस उत्तम संधी, सकारात्मक ऊर्जा आणि यश घेऊन येणार आहे. अशा वेळी आत्मविश्वास, संयम आणि योग्य निर्णय क्षमतांचा उपयोग केल्यास पुढील काही दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरतील.<strong> ( सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी यावर दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
संघर्ष संपला! चंद्राची कृपा, आजपासून या राशींचे लोक धनवान होणार, वाचा राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल