Astrology: भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
- Published by:Ramesh Patil
 
Last Updated:
Shani Astrology November: नोव्हेंबर महिना ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास असणार आहे. शनिच्या स्थितीत या महिन्यात महत्त्वाचा बदल होणार आहे. वक्री चाललेला शनी आता त्याच्या चालीत बदल करून सरळ मार्गी चाल करणार आहे. शनि सरळ मार्गी झाल्याचा अनेक राशींवर सरळ प्रभाव दिसून येईल. शनी सरळ मार्गी झाल्यानंतर कर्माचे फळ लवकर मिळू लागते, असे मानले जाते.
advertisement
1/6

 येत्या 28 नोव्हेंबर रोजी शनिदेव सरळ मार्गी होत असल्यामुळे काही राशींना संपत्ती, करिअर आणि प्रतिष्ठा यामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया शनीच्या चालीतील बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.
advertisement
2/6
 वृषभ : या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. शनिदेव सरळ मार्गी होत असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होईल आणि गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदारांना प्रमोशन मिळेल. विविध माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
 कन्या : शनिच्या स्थितीमुळे तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कन्या राशीच्या लोकांसाठी शनिदेव अर्थलाभ आणि स्थिरता घेऊन येत आहेत. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. घरातील वातावरण सकारात्मक राहील. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
 मकर : शनिच्या स्थितीमुळे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. मकर राशीच्या लोकांसाठी शनी सरळ मार्गी झाल्यामुळे शुभ राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अडचणी संपून आता आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे.
advertisement
5/6
 कुंभ: शनिच्या सरळमार्गी स्थितीमुळे पदोन्नती, मान-प्रतिष्ठा मिळणार आहे. शनी सरळ मार्गी होताच कुंभ राशीच्या लोकांचे नशीब उजळेल. पदोन्नती, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. गुंतवणूक आणि बचतीच्या नवीन संधी निर्माण होतील. जोखमीच्या कामातून चांगली कमाई होईल.
advertisement
6/6
 धनु: शनिच्या या महिन्यातील स्थितीमुळे तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळेल. धनु राशीच्या लोकांनाही शनि सरळ मार्गी असल्यामुळे भरपूर लाभ मिळतील. नवीन काम सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही जुन्या गुंतवणुकीतून किंवा सरकारी योजनेतून चांगला लाभ मिळू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ