TRENDING:

Numerology: 2024 संपेपर्यंत नो टेन्शन! या जन्मतारखांचे लोक भरभरून कमाई करणार

Last Updated:
Numerology Marathi: ज्योतिषशास्त्रात भविष्याचा वेध घेण्यासाठी अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रात, सर्व ग्रहांचा स्वतःचा एक खास अंक असतो. म्हणजेच सर्व ग्रहांना वेगवेगळे अंक देण्यात आले आहेत. त्यामुळेच काही अंक आपल्यासाठी शुभ असतात तर काही अशुभ असतात. 2024 वर्षाचा अंक आठ होतो. हा अंक शनि ग्रहाचा आहे, त्यामुळे वर्षभर शनीचा प्रभाव राहील. परिणामी ज्या लोकांचा मूलांक आठ आहे, त्यांच्यासाठी उरलेले 2024 वर्ष खूप शुभ असणार आहे.
advertisement
1/5
Numerology: 2024 संपेपर्यंत नो टेन्शन! या जन्मतारखांचे लोक भरभरून कमाई करणार
महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक आठ असतो. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. आठ मूलांक असलेल्या उरलेले 2024 हे वर्ष कसे असेल ते जाणून घेऊया. 
advertisement
2/5
करिअर व व्यवसायत मिळेल यश -आठ मूलांक असणाऱ्या लोकांसाठी येणारे दिवस फायदेशीर ठरू शकतात. या काळात नशीबाची तुम्हाला साथ मिळेल. कारण तुमच्यावर शनिदेवाची खास कृपा असेल. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळतील. तसेच या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही लहान किंवा मोठा प्रवास करू शकता.
advertisement
3/5
या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमधील काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. या कालावधीत केलेली गुंतवणूक तुम्हाला दुप्पट नफा मिळवून देईल. समाजात तुम्हाला खूप मान-सन्मान मिळेल.
advertisement
4/5
धन-संपत्ती प्राप्त होईल - येत्या काळात तुम्हाला एखादं वाहन किंवा प्रॉपर्टी प्राप्त होऊ शकते. तसेच, जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. या काळात नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मोठं पद मिळू शकतं. तसेच तुमचे व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक होईल. तसेच, या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते.
advertisement
5/5
तुम्हाला तुमच्या लोकप्रियतेतही वाढ झाल्याचं दिसून येईल. यासोबतच तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. या काळात तुमच्या ठरवलेल्या योजना यशस्वी होतील. तसेच या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल, ज्यामुळे लोक तुमच्यापासून प्रभावित होतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: 2024 संपेपर्यंत नो टेन्शन! या जन्मतारखांचे लोक भरभरून कमाई करणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल