Numerology: जन्मजातच भाग्यवान म्हणावं असं आयुष्य! या 3 जन्मतारखा असलेल्यांना थेट 'मोठी शिडी' मिळते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi : अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा एक मूलांक असतो. मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेची बेरीज. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 9 आहे. मूलांक तुमच्या स्वभावाविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी आणि भविष्याविषयी अनेक गोष्टी सांगतो. प्रत्येक अंकाचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आणि महत्त्व असतं.
advertisement
1/6

मूलांकांचे महत्त्व: प्रत्येक मूलांकाचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी असतो, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या स्वभावावर त्या ग्रहाचा प्रभाव दिसून येतो. उदाहरणार्थ, मूलांक 1 चा स्वामी सूर्य आहे, त्यामुळे या लोकांमध्ये नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास असतो.
advertisement
2/6
मूलांक 7 - मूलांक 7 असलेले लोक कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आयुष्यात पुढे जातात. ते कुठेही जातात तिथं आपल्या कामानं स्वतःची वेगळी छाप पाडतात. या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यांच्यामध्ये धैर्य असते, कठोर परिश्रम आणि इतरांप्रती दयाळूपणा असतो. त्यामुळे या लोकांना समाजात महत्त्वाचे स्थान मिळते.
advertisement
3/6
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल तर त्यांचा मूलांक 7 मानला जातो. या संख्येचा स्वामी ग्रह केतू आहे. 7 मूलांकाचे लोक धाडसी, मेहनती आणि स्वावलंबी मानले जातात. ते प्रत्येक काम पूर्ण आत्मविश्वासाने करण्यावर विश्वास ठेवतात.
advertisement
4/6
कठोर परिश्रमाने नाव आणि प्रसिद्धी - 7 मूलांकाचे लोक त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने समाजात आणि कार्यक्षेत्रात एक विशेष ओळख निर्माण करतात. शिक्षण क्षेत्र असो, व्यवसाय असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, हे लोक त्यांच्या प्रामाणिकपणा आणि समर्पणाने सर्वत्र यश मिळवतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे ते लोकांमध्ये प्रसिद्ध आणि आदरणीय राहतात.
advertisement
5/6
स्वभाव आणि व्यक्तिमत्व - या मूलांकाचे लोक दयाळू आणि सभ्य स्वभावाचे असतात. ते फार चांगले बोलणारे आकर्षक असतात, समोरच्या व्यक्तीचे मन जिंकतात. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतं. आपल्या वेगळ्या विचारसरणीच्या बळावर जीवनात आर्थिक यश देखील मिळवतात.
advertisement
6/6
राग आल्यास - मूलांक 7 असलेले लोक सामान्यतः शांत असतात, परंतु कधी-कधी रागाच्या भरात ते खूप आक्रमक होऊ शकतात. रागामध्ये ते योग्य निर्णय घेण्यात चुका देखील करतात, ज्यामुळे त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: जन्मजातच भाग्यवान म्हणावं असं आयुष्य! या 3 जन्मतारखा असलेल्यांना थेट 'मोठी शिडी' मिळते