TRENDING:

भावनेपेक्षा 'लॉजिक' महत्वाचं! 'या' मूलांकांच्या मुलींना ब्लॅकमेल करणं असत अशक्य, विचार करून निभावतात नातं

Last Updated:
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची निर्णयक्षमता त्याच्या जन्मतारखेवर अवलंबून असते. काही मुली अत्यंत हळव्या आणि भावूक असतात, तर काही मुली भावनांपेक्षा 'लॉजिक'ला जास्त महत्त्व देतात.
advertisement
1/7
भावनेपेक्षा 'लॉजिक' महत्वाचं! 'या' मूलांकांच्या मुलींना ब्लॅकमेल करणं असत अशक्य, विचार करून निभावतात नातं
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची निर्णयक्षमता त्याच्या जन्मतारखेवर अवलंबून असते. काही मुली अत्यंत हळव्या आणि भावूक असतात, तर काही मुली भावनांपेक्षा 'लॉजिक'ला जास्त महत्त्व देतात. अंकशास्त्रानुसार या विशिष्ट मूलांकांच्या मुली कोणत्याही नात्यात वाहवत न जाता, अत्यंत विचारपूर्वक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून निर्णय घेतात.
advertisement
2/7
मूलांक 2: मूलांक 2 च्या मुली जरी चंद्राच्या प्रभावामुळे कल्पक असल्या, तरी त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन विचार करतात. कोणत्याही नात्यात समोरच्या व्यक्तीची पात्रता तपासूनच त्या पुढे पाऊल टाकतात. त्यांचा निर्णय सहसा चुकत नाही.
advertisement
3/7
मूलांक 3: मूलांक 3 च्या मुलींवर गुरु ग्रहाची कृपा असल्याने त्या अत्यंत ज्ञानी असतात. कोणत्याही नात्यात समोरच्या व्यक्तीची पात्रता तपासूनच त्या पुढे पाऊल टाकतात. त्यांचा निर्णय सहसा चुकत नाही.
advertisement
4/7
मूलांक 5: 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 5 असतो. बुध ग्रहामुळे या मुलींची बुद्धी तीक्ष्ण असते. त्या अत्यंत 'प्रॅक्टिकल' असतात. एखादे नाते निभवायचे की नाही, याचा निर्णय त्या केवळ भावनांच्या आधारे घेत नाहीत, तर त्या नात्याचा भविष्यात काय फायदा किंवा तोटा होईल, याचाही विचार करतात.
advertisement
5/7
मूलांक 6: 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या मुली दिसायला मोहक असल्या तरी त्या शिस्तीच्या पक्क्या असतात. त्यांना खोटेपणा अजिबात सहन होत नाही. त्या प्रत्येक नात्यात स्पष्टवक्तेपणाला महत्त्व देतात. जर त्यांना एखादी गोष्ट पटली नाही, तर त्या ती स्पष्टपणे मांडतात, मग समोरची व्यक्ती कितीही जवळची का असेना.
advertisement
6/7
मूलांक 8: 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 8 असतो. शनीच्या प्रभावामुळे या मुली जमिनीवर पाय ठेवून वागणाऱ्या असतात. त्या स्वप्नांच्या जगात जगत नाहीत. कठीण प्रसंगातही त्या डगमगून न जाता थंड डोक्याने तोडगा काढतात. त्या प्रत्येक नात्याला वेळ देतात, पण ते नाते आत्मसन्मानापेक्षा मोठे नसते, याची त्यांना जाणीव असते.
advertisement
7/7
मूलांक 9: 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 9 असतो. मंगळामुळे त्या स्वभावाने थोड्या कडक वाटू शकतात, पण त्या अत्यंत पारदर्शक असतात. त्या कोणावरही आंधळा विश्वास ठेवत नाहीत. त्या स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणे पसंत करतात आणि नात्यातही समानतेला महत्त्व देतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
भावनेपेक्षा 'लॉजिक' महत्वाचं! 'या' मूलांकांच्या मुलींना ब्लॅकमेल करणं असत अशक्य, विचार करून निभावतात नातं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल