Vastu Tips: इथं-तिथं कुठंही खिळा मारून टांगू नका! नवीन वर्षाचं कॅलेंडर लावण्यासाठी या दिशेची भिंत शुभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Auspicious Directions for hanging calendar: नवीन वर्ष 2026 च्या सुरुवातीला घरात नवीन कॅलेंडर लावताना वास्तुशास्त्राचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या दिशेला लावलेले कॅलेंडर प्रगतीत खिळ घालू शकते, तर योग्य दिशेला लावल्यास सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.
advertisement
1/7

पूर्व दिशा: नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आणि प्रगतीसाठी कॅलेंडर पूर्व दिशेच्या भिंतीवर लावावे. ही सूर्याची दिशा असल्याने ती नवीन संधी आणि उत्कर्षाचे संकेत देते. प्रेरणादायी सुविचार किंवा चित्रे असलेले कॅलेंडर येथे लावणे फायदेशीर ठरते.
advertisement
2/7
उत्तर दिशा: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी उत्तर दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावणे उत्तम मानले जाते. ही समृद्धीची दिशा आहे. येथे साध्या किंवा प्रोफेशनल डिझाइनचे कॅलेंडर वापरावे.
advertisement
3/7
ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व): आध्यात्मिक प्रगती आणि आत्मचिंतनासाठी ईशान्य कोपऱ्यातील भिंत निवडावी. यामुळे मानसिक शांती मिळते. आध्यात्मिक फोटो असलेले कॅलेंडर येथे लावणे शुभ असते.
advertisement
4/7
नैऋत्य दिशा (दक्षिण-पश्चिम): नात्यांमधील ओलावा आणि प्रेम वाढवण्यासाठी या दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावावे. मनाला प्रसन्न करणाऱ्या आकर्षक फोटोंचे कॅलेंडर या दिशेला सकारात्मक ऊर्जा देते.
advertisement
5/7
पश्चिम दिशा: सर्जनशीलता आणि नवीन कल्पना सुचण्यासाठी पश्चिम दिशा उत्तम मानली जाते. जर तुम्ही कलाकार असाल किंवा कल्पक काम करत असाल, तर कलेशी संबंधित डिझाइन असलेले कॅलेंडर येथे लावावे.
advertisement
6/7
दक्षिण दिशा: वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला कधीही कॅलेंडर लावू नये. यामुळे कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे येतात आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
advertisement
7/7
दरवाजा किंवा खिडकी: मुख्य दरवाजा किंवा खिडकीच्या वर कॅलेंडर लटकवू नका. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो. नवीन वर्ष सुरू झाले की जुने कॅलेंडर त्वरित काढून टाकावे. जुने कॅलेंडर घरात ठेवणे म्हणजे भूतकाळात अडकून राहण्यासारखे मानले जाते, ज्यामुळे प्रगती थांबते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Vastu Tips: इथं-तिथं कुठंही खिळा मारून टांगू नका! नवीन वर्षाचं कॅलेंडर लावण्यासाठी या दिशेची भिंत शुभ