Jupiter Ast: गुरूच्या प्रभावामुळे गुप्तधन, अचानक आर्थिक लाभ; या 3 राशींचे पालटणार भाग्य
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Jupiter Ast In Vrishbha: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार देवगुरु बृहस्पति (गुरू ग्रह) सध्या स्वतःच्या मेष राशीत विराजमान आहे. 1 मे 2024 रोजी गुरू मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. याचा सर्व 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम दिसेल. त्यानंतर लगेच म्हणजेच 2 मे रोजी गुरूचा वृषभ राशीत अस्त होईल. यानंतर तो 03 जूनपर्यंत याच स्थितीत राहील. गुरु ग्रहाच्या अस्तामुळे काही राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने संपत्तीत वाढ होईल. जाणून घेऊया गुरू ग्रहाच्या अस्तामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.
advertisement
1/6

कर्क - या राशीमध्ये गुरू अकराव्या भावात अस्ताला जात आहे. अशा स्थितीत कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात अधिक सकारात्मक परिणाम दिसू शकतात. नवव्या घराचा स्वामी असल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता.
advertisement
2/6
कर्क - व्यवसायात नवीन योजना लाभदायी ठरतील. तुम्हाला चांगले शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. विविध क्षेत्रात शुभ परिणाम दिसतील. यासोबतच उत्पन्नातही चांगली वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील.
advertisement
3/6
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी बृहस्पती ग्रहाची स्थिती संमिश्र परिणाम देऊ शकते. सूर्य आणि गुरूची मैत्री जमते. त्यामुळे गुरूच्या अस्ताचा या राशीच्या लोकांच्या जीवनावर फारसा परिणाम होणार नाही. अनुकूल परिणाम दिसू शकतात. कामाच्या ठिकाणी शुभ संकेत मिळू शकतात.
advertisement
4/6
सिंह - नोकरीत बदल होण्याची दाट शक्यता आहे. पण तुमचा अहंकार नियंत्रणात ठेवा, कारण त्यामुळे तुमचे काम बिघडू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला आदर मिळेल. यासोबतच गुरूच्या प्रभावामुळे गुप्त धनही मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
advertisement
5/6
तूळ - या राशीच्या लोकांसाठी बृहस्पति ग्रहाची स्थिती चांगली ठरेल. तुमची मेहनत आणि समर्पण आता फळ देईल. भाऊ-बहिणींसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. कर्जमुक्तीमुळे संपत्तीत वाढ होईल. यासोबतच कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल.
advertisement
6/6
तूळ - आर्थिक आव्हानांमधून हळूहळू आराम मिळू शकतो. अध्यात्माकडे वाटचाल कराल. याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Jupiter Ast: गुरूच्या प्रभावामुळे गुप्तधन, अचानक आर्थिक लाभ; या 3 राशींचे पालटणार भाग्य