TRENDING:

अखेर शनीची कृपा होणार! 2027 मध्ये 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब पालटणार, राजासारखा ऐशो आरामात जगणार आयुष्य

Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये शनी ग्रहाला 'न्यायाधीश' आणि कर्माचे फळ देणारा ग्रह मानले जाते. शनीची चाल अत्यंत संथ असते, त्यामुळे तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. सध्या शनी कुंभ राशीत असून लवकरच तो मीन राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
1/5
अखेर शनीची कृपा होणार! 2027 मध्ये 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब पालटणार
ज्योतिषशास्त्रामध्ये शनी ग्रहाला 'न्यायाधीश' आणि कर्माचे फळ देणारा ग्रह मानले जाते. शनीची चाल अत्यंत संथ असते, त्यामुळे तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. सध्या शनी कुंभ राशीत असून लवकरच तो मीन राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
2/5
मात्र, खऱ्या अर्थाने भाग्योदयाचा काळ 3 जून 2027 रोजी सुरू होईल, जेव्हा शनी मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल. 2027 मधील हे राशी परिवर्तन कुंभ राशीसह तीन राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींचे नशीब इतके उजळणार आहे की ते एखाद्या राजासारखे ऐश्वर्यसंपन्न जीवन जगू शकतील.
advertisement
3/5
कुंभ: कुंभ राशीच्या लोकांसाठी 2027 हे वर्ष ऐतिहासिक ठरेल. गेल्या सात-साडेसात वर्षांपासून सुरू असलेली शनीची साडेसाती 3 जून 2027 रोजी पूर्णपणे समाप्त होईल. साडेसाती संपताच मानसिक तणाव दूर होईल. रखडलेली सर्व कामे वेगाने पूर्ण होतील. शनी स्वतः या राशीचा स्वामी असल्याने, तो जाता जाता या राशीला अमाप धनसंपत्ती आणि प्रगती देऊन जाईल. नोकरीत मोठे पद आणि व्यवसायात प्रचंड नफा मिळण्याचे योग आहेत.
advertisement
4/5
सिंह: सिंह राशीच्या जातकांसाठी सध्या शनीची अडीचकी सुरू आहे. 2027 मध्ये शनी मेष राशीत जाताच सिंह राशीची या अडीचकीतून मुक्तता होईल. करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. जे लोक अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना प्रतिष्ठित नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि सरकारी कामांत यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
advertisement
5/5
धनु: धनु राशीच्या लोकांवर असलेली शनीची अडीचकी देखील 2027 मध्ये संपणार आहे. शनीच्या मेष राशीतील प्रवेशामुळे धनु राशीला 'राजयोग' समान फळे मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जर तुमचे स्वतःचे घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न असेल, तर ते या काळात पूर्ण होईल. आरोग्याच्या समस्यांपासून कायमची सुटका मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अखेर शनीची कृपा होणार! 2027 मध्ये 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब पालटणार, राजासारखा ऐशो आरामात जगणार आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल