TRENDING:

Shani: साडेसाती म्हणजे संकट नव्हे, डोळे खाडकन उघडतात! राशीचक्रकार शरद उपाध्ये असं का म्हणाले?

Last Updated:
ShaniDev Marathi Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या साडेसातीला सगळेजण घाबरतात. आपल्या राशीला साडेसाती आहे, म्हटल्याबरोबर अनेकांना भीती वाटू लागते, शनिची साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा काळा जीवनात त्रास, संघर्ष आणतो असे मानले जाते. परंतु, प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ, राशीचक्रकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद उपाध्ये यांनी याविषयी वेगळ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.
advertisement
1/5
साडेसाती म्हणजे संकट नव्हेच, डोळे खाडकन उघडतात!  शरद उपाध्ये असं का म्हणाले
अलिकडेच न्यूज 18 लोकमतच्या पॉडकास्टमध्ये शरद उपाध्ये आले हाते. त्याला कारण म्हणजे 29 मार्च रोजी शनिचे राशी परिवर्तन झालं आहे. मंदगती शनी कुंभ राशीतून मीन राशीत आला आहे. त्यामुळे सध्या कुंभ, मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती चालू आहे.
advertisement
2/5
ज्ञानदा कदम यांच्या प्रश्नांना उत्तर देताना राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी सांगितलं, की साडेसाती म्हणजे वाईटच घडतं असं मुळीच नाही. अनेकांचा असा गैरसमज आहे, शनी मीन राशीत आल्यामुळे मीन राशीच्या लोकांना शनी साडेसात वर्षे प्रचंड त्रास देईल. परंतु याला आपण त्रास म्हणता कामा नये.
advertisement
3/5
शनी आपल्या घरातील आजोबांप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे आजोबा आपण सुधारण्यासाठी आपले कान धरतात. त्याप्रमाणे शनी आपल्या जिवाला शिवाचं रुप दाखवतात, किनाऱ्यावर आणतो, जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी मार्गदर्शन करतो, संयम शिकवतो. समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करायला शिकवतो.
advertisement
4/5
साडेसाती असताना शनी आपल्याला मेहनत करायला लावतो. मीन राशीत शनी आपल्यामुळे मीन राशीचे लोक आता मेहनतीने, कष्टाने काम करणार. तसेच, त्याचा त्यांना चांगला फायदाही होणार आहे.
advertisement
5/5
शनीच्या साडेसातीला घाबरायचं नाही. शनी शिक्षण देतो वैराग्याचं, वासनामुक्त होण्याचं. शनिच्या साडेसातीनंतर माणूस अंतर्मुख होतो. मीन, कुंभ आणि मेष या राशी नशिबवान आहेत. या राशींच्या आयुष्यात आता खरा प्रकाश पडणार आहे, असे ते म्हणाले(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani: साडेसाती म्हणजे संकट नव्हे, डोळे खाडकन उघडतात! राशीचक्रकार शरद उपाध्ये असं का म्हणाले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल