सावधान! शनीचा प्रकोप 'या' मूलांकांसाठी ठरतो घातक, साडेसातीमुळे करावा लागतो संघर्षाचा सामना
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रानुसार, मानवी स्वभाव आणि नशिबावर ग्रहांचा मोठा प्रभाव असतो. जसे काही मूलांकांवर शनीची कृपा असते, तसेच काही मूलांक असे आहेत ज्यांना शनीच्या प्रकोपाचा आणि संघर्षाचा वारंवार सामना करावा लागतो.
advertisement
1/7

अंकशास्त्रानुसार, मानवी स्वभाव आणि नशिबावर ग्रहांचा मोठा प्रभाव असतो. जसे काही मूलांकांवर शनीची कृपा असते, तसेच काही मूलांक असे आहेत ज्यांना शनीच्या प्रकोपाचा आणि संघर्षाचा वारंवार सामना करावा लागतो.
advertisement
2/7
मूलांक 4 (राहू आणि शनीचा प्रभाव): ज्यांचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो. या मूलांकाचा स्वामी राहू असला तरी, शनीची सावली यांच्यावर नेहमी असते. या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक संकटे येतात. कामात वारंवार अडथळे येणे आणि मानसिक तणाव राहणे ही शनीच्या प्रकोपाची लक्षणे असू शकतात.
advertisement
3/7
मूलांक 7 (केतू आणि शनीची युती): 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. या व्यक्तींना यश मिळवण्यासाठी इतरांपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागते. शनीच्या प्रभावामुळे यांना अनेकदा एकटेपणा जाणवतो आणि जवळच्या व्यक्तींकडूनच फसवणूक होण्याची शक्यता असते.
advertisement
4/7
मूलांक 8 (थेट शनीचा मूलांक): 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा स्वामी स्वतः शनी आहे. जरी शनी यांचा मित्र असला, तरी कर्मात थोडीही चूक झाल्यास शनी यांना साडेसातीपेक्षाही कठीण काळ दाखवतो. यांना आयुष्यात काहीही सहजासहजी मिळत नाही; प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो.
advertisement
5/7
साडेसातीचा तीव्र प्रभाव: जेव्हा या मूलांकाच्या व्यक्तींच्या राशीत शनीची साडेसाती किंवा ढिय्या सुरू होतो, तेव्हा त्याचा परिणाम इतर मूलांकांच्या तुलनेत अधिक तीव्र असतो. आर्थिक नुकसान, आरोग्याच्या समस्या आणि विनाकारण होणारी बदनामी यामुळे या व्यक्ती खचून जाऊ शकतात.
advertisement
6/7
आरोग्याच्या तक्रारी: शनीच्या प्रकोपा मुळे या मूलांकाच्या व्यक्तींना हाडांचे विकार, सांधेदुखी किंवा पोटाचे जुनाट आजार उद्भवू शकतात. जर शनी कुंडलीत नीच स्थानी असेल, तर अपघातांची भीती देखील वाढते.
advertisement
7/7
बचावासाठी उपाय: या व्यक्तींनी शनीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच, 'हनुमान चालीसा' वाचणे हा या व्यक्तींसाठी सर्वात मोठा सुरक्षा कवच मानला जातो. खोटं बोलणे आणि मद्यपान करणे टाळल्यास शनीचा त्रास कमी होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
सावधान! शनीचा प्रकोप 'या' मूलांकांसाठी ठरतो घातक, साडेसातीमुळे करावा लागतो संघर्षाचा सामना