TRENDING:

2 तास 19 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा, पुष्पा-दृश्यमपेक्षा खतरनाक; बजेटच्या दुप्पट केली कमाई

Last Updated:
Suspense Thriller Film : 2 तास 19 मिनिटांचा हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहायला एकदा सुरुवात केली तुम्ही तो संपल्याशिवाय उठणार नाही. या सिनेमाला 7 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत. कोणता आहे हा सिनेमा पाहूयात.
advertisement
1/8
2 तास 19 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा, पुष्पा-दृश्यमपेक्षा खतरनाक
कुटुंब, गुन्हेगारी आणि मेंटल गेम... प्रत्येक सीनमध्ये धक्कादायक ट्विस्ट आणि सस्पेन्सने भरलेली ही स्टोरी आहे. तुम्हाला सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा आवडत असतील तर हा सिनेमा तुमच्यासाठीच आहे. ही स्टोरी एका निष्पाप मुलींच्या अचानक गायब होण्यापासून सुरू होते आणि हळूहळू एका राक्षसाची कहाणी उलगडते. 
advertisement
2/8
निष्पाप मुलींभोवती फिरणारी ही स्टोरी यात अनेक काळी सत्य उलगडली जातात. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि तगडी पटकथा यामुळे हा सिनेमा कुठच्या कुठे गेला आहे. स्टोरीमधील ट्विस्ट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. या सिनेमासमोर अॅक्शन आणि मसाला असलेले सिनेमेही फिके पडतात. 
advertisement
3/8
'चित्ता' असं या सिनेमाचं नाव असून हा सिनेमा अॅक्शन ड्रामा थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला आहे. हा मूळ तमिळ सिनेमा असून तुम्ही तो हिंदीतही पाहू शकता. 
advertisement
4/8
सिनेमाच्या कथेत अनेक लहान डिटेल्स बारकाईनं दाखवले गेलेत. हा सिनेमा तरुण मुलींवर झालेल्या बलात्कारावर आधारित आहे. ही 5-6 वर्षांची मुलगी सुंदरीची स्टोरी आहे. सुंदरीचे वडील वारले आहेत. ती तिच्या काका (सिद्धार्थ) आणि आईसोबत राहते. त्यांचं एक लहान आणि साधं कुटुंब आहे. 
advertisement
5/8
एके दिवशी सुंदरीच्या शाळेतील मैत्रिणीवर क्रूर हल्ला होतो आणि तिच्या काकांना दोषी ठरवले जाते. त्यांनंतर सुंदरीचंही अपहरण होतं. आरोपी दुसराच कोणीतरी असतो. सिद्धार्थ बलात्काराला कसा पकडतो याभोवती हा सिनेमा आहे. 
advertisement
6/8
2 तास 19 मिनिटांच्या या सिनेमात आदिती रॉय हैदरीचा पती सिद्धार्थ मुख्य भूमिकेत आहे. 5 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमानं रिलीजनंतर बजेट दुप्पट म्हणजेच 12.36 कोटींची कमाई केली होती. 
advertisement
7/8
हा सिनेमा 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज झाला. 69 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स साऊथमध्ये या सिनेमाने तमिळमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सात पुरस्कार जिंकले. या सिनेमाचं आयएमडीबी रेटिंग 8.2 आहे.
advertisement
8/8
'पुष्पा', 'दृश्यम', 'केजीएफ', आणि अगदी 'पुष्पा 2' सारख्या सिनेमांना हा सिनेमा चांगलीच टक्कर देतो.  थरारक, इमोशन्सने भरलेला हा सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत श्वास रोखून पाहावासा वाटतो. हा सिनेमा जिओस्टारवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 तास 19 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा, पुष्पा-दृश्यमपेक्षा खतरनाक; बजेटच्या दुप्पट केली कमाई
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल