TRENDING:

2 मार्चला 1 वाजून 1 मिनिटांनी 'या' राशींचं नशीब पालटणार, खास 'राजयोगा'मुळे जगणार लक्झरी लाइफ!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालीत होणारा प्रत्येक बदल मानवी जीवनावर खोलवर परिणाम करतो. होळीच्या सणापूर्वी अवकाशात एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे.
advertisement
1/7
2 मार्चला 1 वाजून 1 मिनिटांनी 'या' राशींचं नशीब पालटणार, जगणार लक्झरी लाइफ!
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालीत होणारा प्रत्येक बदल मानवी जीवनावर खोलवर परिणाम करतो. होळीच्या सणापूर्वी अवकाशात एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. 2 मार्च 2026 रोजी पहाटे 1 वाजून 1 मिनिटांनी ऐश्वर्य, सौंदर्य आणि सुखाचा कारक असलेला शुक्र ग्रह कुंभ राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करेल.
advertisement
2/7
मीन राशीत आधीच शनी विराजमान आहे आणि मिथुन राशीतील गुरुसोबत शुक्राचा केंद्र योग तयार होत आहे. शुक्राच्या या उच्च राशीतील भ्रमणामुळे 'मालव्य राजयोग' निर्माण होत आहे. हा योग विशेषतः काही राशींसाठी भाग्योदयाचा काळ घेऊन येईल.
advertisement
3/7
शुक्र जेव्हा मीन राशीत असतो, तेव्हा तो आपल्या उच्च स्थितीत असतो, म्हणजेच तो त्याचे सर्वोत्तम फळ देतो. 2 मार्च ते 25 मार्च 2026 या काळात शुक्र मीन राशीत राहील. मालव्य राजयोगामुळे व्यक्तीच्या आयुष्यात भौतिक सुखे, लक्झरी, प्रेम आणि संपत्तीची वाढ होते. ज्यांना करिअरमध्ये मोठे यश हवे आहे किंवा ज्यांचे विवाह रखडले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ वरदानासारखा ठरेल.
advertisement
4/7
वृषभ: वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र असल्याने हे संक्रमण तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. ज्योतिषांच्या मते, तुमच्या अराव्या भावात शुक्र येत असल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल. सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू किंवा वाहन खरेदी करू शकता.
advertisement
5/7
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र दहाव्या भावात गोचर करणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढीचे योग आहेत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. मीडिया, फॅशन किंवा कला क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हा सुवर्णकाळ असेल.
advertisement
6/7
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या पाचव्या भावात शुक्राचे आगमन होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शिक्षणात यश देणारा असेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. शेअर मार्केट किंवा लॉटरीतून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
कुंभ: तुमच्या दुसऱ्या भावात शुक्र संक्रमण करेल. आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. तुमच्या बोलण्याच्या शैलीमुळे तुम्ही कठीण कामे सहज साध्य कराल. दागिन्यांच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
2 मार्चला 1 वाजून 1 मिनिटांनी 'या' राशींचं नशीब पालटणार, खास 'राजयोगा'मुळे जगणार लक्झरी लाइफ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल