पैठणमध्ये नदीत सापडतंय सोनं, लोकांची तुफान गर्दी, पाहा PHOTOS
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पाणी ओसरताच नदीकाठावर एक वेगळीच हालचाल सुरू झाली आहे. गाळात मौल्यवान धातू मिळत असल्याच्या चर्चेमुळे अनेक जण चाळण्या, टोपल्या घेऊन नदीपात्रात उतरत आहेत.
advertisement
1/7

छत्रपती संभाजीनगरमधील पैठणजवळील जायकवाडी धरण येथून नाथषष्ठीच्या निमित्ताने पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आल्यानंतर गोदावरी नदीचे काही भाग उघडे पडले आहेत. पाणी ओसरताच नदीकाठावर एक वेगळीच हालचाल सुरू झाली आहे. गाळात मौल्यवान धातू मिळत असल्याच्या चर्चेमुळे अनेक जण चाळण्या, टोपल्या घेऊन नदीपात्रात उतरत आहेत.
advertisement
2/7
दशक्रिया घाटामुळे सोन्याची चर्चा : पैठणमधील नाथ मंदिर परिसरातील दशक्रिया विधी घाटांवर दररोज धार्मिक विधी पार पडतात. परंपरेनुसार काही जण राखेसोबत दागिने किंवा धातूंचे अर्पण करतात.
advertisement
3/7
वर्षानुवर्षे हा गाळ पाण्याखाली साचलेला असतो. मात्र सध्या पाणी कमी झाल्याने तो उघड झाला असून, त्यातून सोन्याचे मणी, अंगठ्या किंवा चांदीचे तुकडे सापडत असल्याच्या चर्चेने लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
advertisement
4/7
नशीब आजमावण्यासाठी तासनतास शोध : नदीपात्रात महिला-पुरुषांचा लहानसा मेळा भरल्याचे चित्र दिसत आहे. काही जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाळ चाळत बसलेले दिसतात.
advertisement
5/7
कुणाला किरकोळ दागिने मिळाल्याची माहिती पसरताच दररोज नव्या लोकांची भर पडत आहे. काहींसाठी हे केवळ कुतूहल, तर काहींसाठी अतिरिक्त उत्पन्नाची आशा बनली आहे.
advertisement
6/7
प्रशासनाचे सावधगिरीचे आवाहन : स्थानिक प्रशासनाने मात्र नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पाणी कमी असले तरी नदीतील चिखल खोल आणि धोकादायक असू शकतो. गाळात पाय अडकण्याचा किंवा अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
7/7
दरम्यान, गोदावरीच्या उघड्या पात्रात सुरू असलेली ही सोनं शोधण्याची धडपड पैठणमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. नशीब आजमावणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी धोका लक्षात घेऊनच नदीपात्रात उतरणे गरजेचे असल्याचे जाणकार सांगत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पैठणमध्ये नदीत सापडतंय सोनं, लोकांची तुफान गर्दी, पाहा PHOTOS