TRENDING:

Shukra Gochar: 26 मार्च पहाटे 5.13 पासून 3 राशींचा भाग्योदय; एकाच वेळी रास-नक्षत्र बदलून शुक्राचा धुमाकूळ

Last Updated:
Shukra Gochar 2026: राशीचक्राचा अंदाज भविष्य पाहण्यासाठी उपयुक्त ठरतो. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाची विशिष्ट स्थिती ठराविक वेळेला जबरदस्त परिणाम दाखवत असते. प्रत्येक ग्रहाची बलस्थाने वेग-वेगळी आहेत. त्यानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, समृद्धी आणि प्रेमाचा कारक ग्रह मानले जाते. शुक्र भाग्यस्थानात असला तर पैशांची चिंता करण्याची गरज नसते.
advertisement
1/7
26 मार्च पहाटे 5.13 पासून 3 राशींचा भाग्योदय; एकाच वेळी रास-नक्षत्र बदलून शुक्राचा धुमाकूळ
शुक्र भारी भक्कम करण्यासाठी कित्येक लोक उपाय करतात. शुक्राचे स्थान बलवान असते, त्यांना जीवनातील सर्व सुखसोयी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून शुक्राचे गोचर देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. 26 मार्च रोजी रामनवमीच्या दिवशी शुक्राची चाल बदलणार असून त्यानं दुर्मिळ योगायोग जुळणार आहे. दिनांक 26 मार्च रोजी पहाटे 05:13 वाजता शुक्र आपली राशी आणि नक्षत्र बदलणार आहे. या शुक्र गोचरामुळे कोणत्या राशींना फायदा होईल, हे जाणून घेऊ.
advertisement
2/7
शुक्राचे विशेष गोचर - या दिवशी शुक्र मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रात प्रवेश करेल. हे गोचर पाच राशींना करिअरमध्ये प्रचंड लाभ मिळवून देईल. पदोन्नतीची शक्यता असून आर्थिक परिस्थितीत खूपच सुधारणा होईल.
advertisement
3/7
मेष: मेष राशीच्या व्यक्ती करिअरमध्ये मोठी झेप घेतील. तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायात सुवर्णसंधी मिळतील. तुम्ही बऱ्याच काळापासून पदोन्नतीच्या शोधात असाल, तर 26 मार्चनंतर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू लागेल. उत्पन्न दुहेरी मार्गांनी येईल.
advertisement
4/7
वृषभ: तुमच्या सुखसोयी आणि ऐषारामात वाढ होईल. समाजात गाजावाजा वाढेल. तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या भक्कम होईल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत.
advertisement
5/7
सिंह: सिंह राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होतील. परदेश प्रवासासाठी शुभ संधी आहेत. ते जे काही हाती घेतील त्यात यशस्वी होतील. अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळू शकतात. एखादा मोठा करार अंतिम होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
तूळ: शुक्र संक्रमण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण होतील. कला, माध्यम किंवा फॅशन उद्योगांशी संबंधित असलेल्यांना लक्षणीय आर्थिक लाभ होईल. या काळात तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी व्हाल.
advertisement
7/7
मीन: शुक्राचे संक्रमण मीन राशीसाठी देखील फायदेशीर ठरेल. कामात आत्मविश्वास चांगलाच वाढेल. एखाद्या गंभीर आजारांपासून मुक्त व्हाल. भागीदारीतून मोठा नफा मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shukra Gochar: 26 मार्च पहाटे 5.13 पासून 3 राशींचा भाग्योदय; एकाच वेळी रास-नक्षत्र बदलून शुक्राचा धुमाकूळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल