TRENDING:

Lampat Yog 2026: कित्येक वर्षांनी जुळून आला 'लंपट योग'; अचानक श्रीमंतीचे योग 3 राशींच्या नशिबी

Last Updated:
Lampat Yog 2026: ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या चालीला आणि त्यांच्या युतीला खूप महत्त्व असतं. जेव्हा शुभ ग्रह एका विशिष्ट स्थितीत एकत्र येतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. 2026 मध्ये असाच एक दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे, ज्याला लंपट योग असं म्हटलं जातं. हा योग अनेक वर्षांनंतर येतोय. जाणून घेऊया कोणत्या 3 राशींना करिअर आणि पैशांच्या बाबतीत अचानक फायदा होऊ शकतो.
advertisement
1/6
कित्येक वर्षांनी जुळून आला 'लंपट योग'; अचानक श्रीमंतीचे योग 3 राशींच्या नशिबी
कसा तयार होतोय हा लंपट योग?6 फेब्रुवारी 2026 ला सुख, वैभव आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र ग्रह त्याचा मित्र शनीच्या कुंभ राशीत गेला आहे. तिथे आधीपासूनच राहु बसलेला आहे, त्यामुळे शुक्र आणि राहुची युती झाली आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र आहेत. मित्राच्या राशीत दोन परम मित्रांची भेट झाल्यामुळे हा संयोग लय खास झाला आहे.
advertisement
2/6
लंपट योग म्हणजे?ज्योतिषशास्त्रात लंपट योग हा एक दुर्मिळ योग आहे, जो शनी, शुक्र किंवा राहु एका विशिष्ट स्थितीत आल्यावर तयार होतो. यावेळी हा योग कुंभ राशीत बनला आहे. कुंभ राशीचा मालक शनी असल्यामुळे या योगाचा प्रभाव अजूनच शक्तिशाली झाला आहे. जाणकारांच्या मते, असा योग कित्येक वर्षांनंतर येत असल्याने तो खूप शुभ मानला जातोय.
advertisement
3/6
या योगाचं महत्त्व काय?लंपट योगामुळे माणसाच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा, संपत्ती आणि सुख-सोयी मिळवण्याची ओढ वाढते. या योगाच्या प्रभावामुळे अचानक पैसा मिळणं, करिअरमध्ये प्रगती होणं आणि समाजात मान-सन्मान वाढणं असे फायदे होतात. अर्थात, याचा पूर्ण परिणाम तुमच्या स्वतःच्या कुंडलीवर सुद्धा अवलंबून असतो.
advertisement
4/6
मेष - तुमच्यासाठी हा काळ खूप उत्साहाचा असेल. शुक्र-राहु युतीमुळे तुमच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्यात चांगले बदल घडतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकतात. गुंतवणूक किंवा प्रॉपर्टीमधून नफा मिळण्याचे योग आहेत. प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढेल. फक्त विनाकारण खर्च करणं टाळा.
advertisement
5/6
वृषभ - तुमच्यासाठी हा योग पैशांच्या बाबतीत चांगला फायदेशीर ठरेल. अचानक धनलाभ होऊ शकतो आणि कमाईचे नवीन मार्ग सापडतील. करिअर आणि व्यापारात तेजी येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जमीन-जुमल्याच्या कामात यश मिळेल. नात्यांमध्ये स्थिरता राहील.
advertisement
6/6
कन्या - हा काळ तुमच्या वैयक्तिक आणि कामाच्या ठिकाणी प्रगतीचा संकेत देत आहे. करिअरमध्ये अचानक फायदा, उत्पन्नाचे नवीन स्रोत आणि जुन्या कर्जातून सुटका मिळू शकते. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि कौटुंबिक आयुष्य सुखाचं राहील. जर तुम्ही प्लॅनिंग करून काम केलं, तर जास्त फायदा होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Lampat Yog 2026: कित्येक वर्षांनी जुळून आला 'लंपट योग'; अचानक श्रीमंतीचे योग 3 राशींच्या नशिबी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल