TRENDING:

Astrology 2026: मनाची तयारी असावी! सूर्य-राहुचा ग्रहण योग 5 राशींना खतरनाक! मोठा आर्थिक लॉस

Last Updated:
Astrology 2026: ग्रहांचे राशीपरिवर्तन सतत होणारी प्रक्रिया आहे, ग्रहांचे राशीपरिवर्तन होऊन कधी-कधी अशुभ योगांची निर्मिती होत असते. अशुभ छाया ग्रह मानल्या जाणाऱ्या राहू-केतूशी काही ग्रहांची युती झाल्यानंतर वाईट वेळ काही राशीच्या लोकांना पाहावी लागू शकते. ज्योतिषीय गणनेनुसार, 13 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्यदेव मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करेल.
advertisement
1/6
मनाची तयारी असावी! सूर्य-राहुचा ग्रहण योग 5 राशींना खतरनाक! मोठा आर्थिक लॉस
शनिच्या कुंभ राशीत छाया ग्रह राहू आधीच विराजमान आहे, अशा स्थितीत या दोन ग्रहांच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होईल. हा योग 5 राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो.
advertisement
2/6
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी ही युती तणावपूर्ण असू शकते. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या मान-सन्मानाला ठेस पोहोचू शकते. त्यामुळे या काळात कोणत्याही वादापासून दूर राहा. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ अनुकूल नाही.
advertisement
3/6
मिथुन - मिथुन राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. राहूच्या प्रभावामुळे मनात अनामिक भीती आणि भ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. वडिलांशी असलेल्या संबंधात दुरावा येण्याची शक्यता आहे. चालू असलेल्या कामात अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे मानसिक त्रास वाढेल.
advertisement
4/6
सिंह - सूर्य हा सिंह राशीचा स्वामी असल्याने राहूसोबतची त्याची युती सिंह राशीच्या लोकांसाठी सर्वात जास्त आव्हानात्मक असू शकते. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. व्यापारी भागीदारीत फसवणूक होण्याची शक्यता आहे. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा बनलेली कामे बिघडू शकतात.
advertisement
5/6
वृश्चिक- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना करिअर आणि सुख-सुविधांच्या बाबतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कार्यस्थळावर तुमच्या विरोधात कट रचला जाऊ शकतो. घर-कुटुंबात कलहाचे वातावरण राहू शकते. वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्या.
advertisement
6/6
कुंभ - सूर्य आणि राहूची ही युती कुंभ राशीतच होणार आहे, त्यामुळे याचा सर्वात प्रत्यक्ष परिणाम याच राशीवर होईल. तुमच्या स्वभावात क्रोध आणि चिडचिडेपणा वाढू शकतो. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल आणि घेतलेले चुकीचे निर्णय तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology 2026: मनाची तयारी असावी! सूर्य-राहुचा ग्रहण योग 5 राशींना खतरनाक! मोठा आर्थिक लॉस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल