TRENDING:

Astrology: खूप त्रास झालेला सगळ्याचा! या 5 राशींचे आता नशीब चमकणार; शनि-मंगळाकडून सुखद वार्ता

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, August 31, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12
खूप त्रास झालेला सगळ्याचा! या 5 राशींचे आता नशीब चमकणार; शनि-मंगळाकडून खुशखबर
मेष (Aries): रविवारचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकाल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. त्यांचा लाभ घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. वैयक्तिक संबंधांमध्ये आपुलकी राहील. आरोग्याच्या दृष्टीने थोडी खबरदारी घ्यावी. संतुलित आहार घ्यावा आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. मानसिक आरोग्याची काळजी घेणंदेखील महत्त्वाचं आहे. त्यासाठी योगासनं किंवा ध्यान करा. यश तुमच्या पायांशी लोळण घेईल. पण, त्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण गरजेचं आहे. आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने योग्य ती पावलं उचला आणि विचार सकारात्मक ठेवा.Lucky Number: 13Lucky Color: Purple
advertisement
2/12
वृषभ (Taurus): रविवारचा दिवस तुमच्यासाठी विशेष सकारात्मक असणार आहे. तुमच्या कष्टाचं आणि संयमाचं फळ आज तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या प्रयत्नांचं कौतुक होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कारण, खर्चाचा ओघ अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतो. जोडीदाराशी प्रामाणिक संवाद साधल्यास लव्ह लाइफमधील समस्या सुटू शकतात. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.Lucky Number: 1Lucky Color: Black
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आज रविवारचा दिवस तुमच्यासाठी नवीन शक्यतांचे संकेत घेऊन येईल. संपर्कातील लोकांशी संवाद खूप महत्त्वाचा असेल. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यास तुमची उर्जा वाढेल आणि तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. आज तुम्ही प्रगतीशील विचारांवर चर्चा करू शकता. ते तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तुमची जिज्ञासू वृत्ती आणि बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल. एखाद्या जुन्या मित्राची भेट झाल्याने तुम्हाला आनंद आणि ऊर्जा मिळेल. आरोग्याबाबत जागरूक असणं गरजेचं आहे. फिजिकल अॅक्टिव्हिटी किंवा योगासने केल्याने उर्जा वाढेल. ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीची आणि समर्पणाची स्तुती केली जाईल. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात.Lucky Number: 4Lucky Color: Orange
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असू शकतो. तुमची संवेदनशीलता तुम्हाला खोलवर विचार करायला भाग पाडू शकते. जवळच्या लोकांशी संबंध सुधारण्यासाठी योग्य वेळ आहे. तुमच्या भावनांचा तुमच्या निर्णयांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी थोडे अधिक कष्ट करावे लागतील. तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आपले विचार व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका. आर्थिक बाबतीत सावध राहा आणि तुमच्या नियोजनेनुसार खर्च करा. आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हेल्दी पर्याय निवडा जेणेकरून ऊर्जा टिकवून ठेवता येईल. दैनंदिन जीवनात थोडी शांतता आणि शिस्त राखल्यास मानसिक आरोग्याला फायदा होईल. ध्यान आणि योग करावा. जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या सानिध्यात तुम्हाला शांती मिळेल आणि काळजी कमी होईल.Lucky Number: 8Lucky Color: Blue
advertisement
5/12
सिंह (Leo) : सिंह राशीसाठी रविवारचा दिवस खूप सकारात्मक असेल. तुमचा आत्मविश्वास आणि उर्जा तुम्हाला नवीन संधींना सामोरं जाण्यासाठी प्रेरणा देईल. आज कोणत्याही कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला आनंद आणि आराम मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. प्रत्येक गुंतवणुकीतून लगेच लाभ मिळणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी आणि संतुलित आहार घ्यावा. प्रेम संबंधांमध्ये, आज तुम्ही तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकाल. आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी सकारात्मक असेल.Lucky Number: 10Lucky Color: Dark Green
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज रविवारी कामात मेहनतीचं फळ मिळेल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करा. कारण, छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम करू शकतात. तुम्ही जवळचा मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्याल. आर्थिक बाबतीत सावध राहा आणि अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्यावी. नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. सकारात्मकपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा.Lucky Number: 5Lucky Color: White
advertisement
7/12
तूळ (Libra) : रविवारचा दिवस सुसंवादी आणि समतोल असेल. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांशी चांगले संबंध निर्माण करू शकाल. एखाद्या चर्चेत भाग घेऊन आणि आपले विचार स्पष्टपणे व्यक्त केल्यास नवीन शक्यतांचे दरवाजे उघडू शकतात. वैयक्तिक संबंध सुधारण्याची शक्यता आहे. तुम्हाला बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ती सोडवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. कामाच्या ठिकाणी सर्जनशीलता गरजेची असेल. नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल तर पुढे जाण्यास हरकत नाही. चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराची गरज आहे. मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी ध्यान किंवा योग करण्यात थोडा वेळ घालवा. आपल्या सभोवतालचं वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा.Lucky Number: 2Lucky Color: Pink
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आज रविवारी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये काही नवीन योजना सुरू आहेत, त्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. स्वत:चे विचार आणि अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. रिलेशनशिपमध्ये असलात, तर आज जोडीदारासोबत संवाद साधण्याची गरज भासेल. जोडीदारासोबत मनातील विचार व्यक्त केल्याने नातं मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. दिनचर्येत योग्य आहार आणि व्यायामाचा समावेश करा. मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. कारण, एकूण आरोग्यासाठी चांगली मानसिक स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. सकारात्मकपणे आणि संयमाने दिवस घालवा. आव्हानांचं संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करा.Lucky Number: 9Lucky Color: Maroon
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आज चर्चेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवू शकाल. ही बाब तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात उपयुक्त ठरतील. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. तुमचं नेटवर्क वाढवण्यासाठी आणि व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांमध्ये विशेष स्थान मिळण्यास मदत होईल. तुम्ही जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवू शकाल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद आणि समाधान मिळेल. संवादात स्पष्टपणा आणि संवेदनशीलता ठेवा. आपल्या दिनचर्येत संतुलन राखा. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यान आणि व्यायामासाठी थोडा वेळ काढा. एकूणच, हा दिवस तुमच्यासाठी नवीन प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. संधींचा पुरेपूर फायदा घ्या.Lucky Number: 11Lucky Color: Red
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज लोक तुमची मेहनत आणि समर्पणाचं कौतुक करतील. सहकाऱ्यांसोबत मिळून प्रयत्न केल्यास कामात सकारात्मक परिणाम मिळतील. नवीन योजनांवर चर्चा करण्याची चांगली संधी मिळेल. ही संधी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. चांगल्या आरोग्यासाठी दिनचर्येत व्यायाम आणि ध्यान करा. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा आणि मानसिक शांती मिळेल. वैयक्तिक संबंधांमध्येदेखील सुधारणा दिसून येईल. नवीन संधी स्वीकारण्यासाठी आणि कौटुंबिक संबंध दृढ करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जा.Lucky Number: 6Lucky Color: Yellow
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीसाठी आज वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रात तुमच्यासाठी भरपूर संधी आहेत. आपल्या नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. गोंधळाच्या स्थितीत असाल तर मित्रांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. ते तुम्हाला मदत करू शकतात. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. योग आणि ध्यानामुळे तुमची मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. मुक्त विचार आणि लवचिकता जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतील. नवीन संधी स्वीकारण्यास सज्ज राहा.Lucky Number: 3Lucky Color: Green
advertisement
12/12
मीन (Pisces) : आज नात्यात परस्पर समंजसपणा आणि सहकार्य वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची सर्जनशीलता चांगल्या प्रकारे दाखवू शकाल. मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ध्यान आणि योग केल्यास मदत होईल. भावनांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण, तुमची संवेदनशीलता थोडी वाढू शकते. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणं जास्त योग्य ठरेल. तुमची स्वप्नं आणि इच्छा महत्वाच्या आहेत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा.Lucky Number: 7Lucky Color: Sky Blue
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: खूप त्रास झालेला सगळ्याचा! या 5 राशींचे आता नशीब चमकणार; शनि-मंगळाकडून सुखद वार्ता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल