TRENDING:

Rashi Bhavishya, 14 Jan 2025: वाईट काळ भयंकर होता! या राशींचे आता नशीब पालटणार; मंगळ-शुक्र भरभरून देणार

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, January 14, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊया.
advertisement
1/12
वाईट काळ भयंकर होता! या राशींचे आता नशीब पालटणार; मंगळ-शुक्र भरभरून देणार
मेष (Aries) : आज तुमच्या आयुष्यात एक उत्साहाची एक लाट येईल जी तुम्हाला प्रगतीकडे नेईल. तुम्हाला अचानकच सुचलेल्या कल्पना किंवा तुमची सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी आज मिळू शकते. सध्या अंतर्ज्ञानशक्ती खूपच विशेष पद्धतीने मदत करत आहे तिच्यावर विश्वासून वागल्यास फायदा होईल. करिअरमधील आव्हानांत तुमच्या नैसर्गिक नेतृत्वगुणाचा उपयोग होईल. जबाबदारी घेऊन समस्यांची सोडवणूक करण्याचं तुमचं कौशल्य दाखवायत कचरू नका. सहकाऱ्यांच्या सूचना आणि कल्पना ऐकून घ्या.Lucky Color : PinkLucky Number : 4
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आज सकाळी नवी प्रेरणा आणि ध्येय मिळेल. वैयक्तिक ध्येय आणि महत्त्वाकांक्षांना बळ मिळेल. मित्र किंवा समविचारी व्यक्ती भेटल्याने सार्वजनिक आयुष्य बहरेल. टीमवर्कमधून नव्या कल्पना सुचू शकतात त्यामुळे टीमवर्क करा. महत्त्वाकांक्षेसाठी धावताना आयुष्याचा समतोल सांभाळा.Lucky Color : MaroonLucky Number : 10
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : एखाद्या मनस्वी मेसेजमुळे जुन्या नात्यांतील आठवणी ताज्या होतील; पण बोलताना ताबा ठेवा कारण गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोलणंच हिताचं ठरेल. करिअरमध्ये नव्या कल्पना सगळ्यांसमोर मांडायला कचरू नका. टीमवर्कने मोठी कामं पूर्ण होतील. थोडक्यात, आज कल्पना मांडा, सार्वजनिक संवादांत सहभागी व्हा आणि येणाऱ्या चढ-उतारांना स्वीकारायला सज्ज रहा.Lucky Color : Dark GreenLucky Number : 1
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आज अंतर्ज्ञान उच्चीला असेल त्यामुळे तुमच्या निर्णयांत स्वत्त्वाची झलक दिसेल. अंतर्मनाशी जोडले जाऊन भावना जाणून घ्या त्यातून अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोन गवसेल. नात्यात नेहमीपेक्षा अधिक सहज संवाद घडेल. जवळच्या व्यक्तींना भेटून गप्पा मारा. गैरसमज दूर करून नाती दृढ करण्यासाठी उत्तम काळ आहे. आजचा दिवस भावनिक दृष्टिने सकारात्मक बदल करण्यासाठी उत्तम आहे.Lucky Color : BlueLucky Number : 9
advertisement
5/12
सिंह (Leo) : नियती तुमच्या आयुष्यात सर्जनशीलतेतून प्रेरणा आणण्याच्या तयारीत आहे. भावनिक नाती दृढ होतील आणि मनस्वी संवादांतून समज वाढेल. ऐका आणि ऐकून घ्या नाती घट्ट होतील. स्वत: ला वेळ द्या त्यामुळे ताजेतवाने व्हाल आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज व्हाल. दिवस मजेत घालवा आणि तुमच्या जवळच्या ऊर्जेचा पुरेपूर फायदा घ्या.Lucky Color : RedLucky Number : 2
advertisement
6/12
कन्या (Virgo) : दिवस आत्मपरीक्षण आणि विश्लेषणाचा आहे. तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या दृष्टिकोनात बदल घडवणारं कुणीतरी भेटेल ज्यातून फलदायी चर्चा घडतील. जेवढं बोलताय तेवढंच ऐका; एकत्र येण्याने नवी दिशा मिळेल. एकूणात विकास आणि संपर्कवृद्धीच्या संधी पकडा. अंतर्ज्ञानावर विश्वासून नव्या गोष्टी करा.Lucky Color : BlueLucky Number : 11
advertisement
7/12
तूळ (Libra) : आज जसजसा दिवस पुढे सरकेल तशा संपर्क आणि कोलॅबरेशनच्या संधी मिळतील. वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्ही नाती वृद्धिंगत होतील त्यामुळे तुमच्या कल्पना इतरांना सांगा. सध्या तुमची उर्जा उच्चीला आहे त्यामुळे मनातल्या भावना व्यक्त करायला उत्तम काळ आहे. त्यामुळे गैरसमज निवळून नाती दृढ होतील. नात्यातील दुरावा भरण्यासाठी योग्य काळ आहे. आज संधी मिळणार आहेत त्यामुळे भवतालच्या उर्जेच्या मदतीने त्यांचा उपयोग करून घ्या.Lucky Color : YellowLucky Number : 7
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : नवं ध्येय मिळाल्याने महत्त्वाकांक्षेने ते पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य वेळ आहे. गुंतवणूक आणि बजेटचा फेरआढावा घ्या. आताच्या नियोजनाचा दीर्घकालीन फायदा होईल. स्वत: ला वेळ द्या. समतोल राखण्यासाठी विश्रांती घ्या. तुमच्या कष्टांना आणि प्रयत्नांना योग्य फळं यतील. तुमच्या भवतीच्या ऊर्जांचा उपयोग करून दिवस आनंदात घालवा.Lucky Color : PurpleLucky Number : 11
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : रोजच्या जीवनातून बाहेर पडून नवे अनुभव घेण्यापासून तुम्ही तुम्हाला रोखू शकणार नाही. या भावनेचा उपयोग करा कारण कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला ही योग्य वेळ आहे. तुमच्या कल्पना आणि संवादातून नाती दृढ होतील. मित्र किंवा कुटुंबियांबरोबर अचानकच एखादी सहल केल्यास ऊर्जा मिळेल.Lucky Color : GreenLucky Number : 3
advertisement
10/12
मकर (Capricorn) : खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात आव्हानं स्वीकारायला तयार आहात असं जाणवेल. विचार मांडायला आणि ऐकायला वेळ काढा ज्यातून समज सुधारेल व नाती घट्ट होतील. स्वत:ची काळजी घ्या. सतत प्रयत्न करण्याची तुमची इच्छा कौतुकास्पद आहेच पण बळ मिळवण्यासाठी विश्रांती गरजेचीच आहे. आज प्रगतीच्या दिशेने चाला आणि मजेत रहा.Lucky Color : Navy BlueLucky Number : 6
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : मनात असलेल्या कल्पना आणि प्रश्नांच्या उकली मार्गदर्शन करत आहेत असं वाटेल. तुमच्या कल्पनाशक्तीच्या आधाराने काही कामं करण्यास योग्य दिवस आहे. सार्वजनिक भेटीही आज महत्त्वाच्या ठरतील. तुमच्या इच्छांशी मिळत्याजुळत्या संधी उपलब्ध करून देऊन नियती तुम्हाला चकित करू शकते. एका विशिष्ट दृष्टिकोनातून कार्य करण्याचा आजचा दिवस आहे. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा.Lucky Color : Sky BlueLucky Number : 12
advertisement
12/12
मीन (Pisces) : आज तुमचं मन, इच्छा, बुद्धी एका लयीत असल्याचं तुम्हाला जाणवेल त्यामुळे स्वत:ची कला सादर करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अतिकाम टाळा. काम-विश्रांती संतुलन पाळा. अंतर्ज्ञानावर विश्वासल्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील. आज पाय जमिनीवर ठेवून मोठ्ठी स्वप्न पहा.Lucky Color : BrownLucky Number : 8
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Rashi Bhavishya, 14 Jan 2025: वाईट काळ भयंकर होता! या राशींचे आता नशीब पालटणार; मंगळ-शुक्र भरभरून देणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल