Vastu Tips: श्रीमंतांच्या घरी दक्षिण दिशेला या गोष्टी ठेवलेल्या पहाल; पैसा-भरभराटीचं गमक
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi : वास्तुशास्त्रात दिशांना अत्यंत महत्त्व आहे, कारण प्रत्येक दिशेचा संबंध विशिष्ट ऊर्जा, ग्रह, देवता आणि नैसर्गिक तत्वांशी असतो. घराची रचना, खोल्यांची मांडणी आणि फर्निचरची जागा या दिशांच्या ऊर्जेनुसार केल्यास घरात सकारात्मकता, आरोग्य, समृद्धी आणि शांती राहते, अशी कित्येक लोकांची धारणा आहे.
advertisement
1/6

वास्तुशास्त्रात काही दिशांना शुभ मानलं जात नाही, त्यापैकी दक्षिण दिशेविषयी अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. दक्षिण दिशेला यम आणि पूर्वजांची दिशा मानली जाते. दक्षिण दिशा प्रत्येक बाबीतच खराब किंवा अशुभ मानली जात नाही. परंतु बहुतेक लोक या दिशेला चुकीचे समजतात.
advertisement
2/6
वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा पूर्णपणे अशुभ नसते. उलट काही खास गोष्टी या दिशेला ठेवल्या गेल्या तर घरात आनंद, समृद्धी आणि संपत्तीचा वाढू शकते. घरात दक्षिण दिशेला कोणत्या गोष्टी ठेवणं शुभ मानलं जातं, याविषयी जाणून घेऊ.
advertisement
3/6
झाडू - झाडू हा माता लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. घरातील झाडू दक्षिण दिशेला ठेवल्यास माता लक्ष्मीची विशेष कृपा नेहमीच राहते. शक्यतो झाडू बाहेरील लोकांच्या थेट नजरेस पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
advertisement
4/6
फिनिक्स पक्षी - या दिशेला फिनिक्स पक्ष्याचा फोटो किंवा चित्र लावणंदेखील खूप शुभ मानलं जातं. यामुळं घरात सकारात्मकता आपोआप येते. तसेच, कुटुंबात पैशाची कमतरता कधीच भासत नाही. अनेक श्रीमंत लोकांच्या घरात निश्चितपणे दक्षिण दिशेला या पक्षाचा फोटो ठेवल्याचे दिसते.
advertisement
5/6
मौल्यवान वस्तू-दागिने - घरातील मौल्यवान वस्तू या दिशांना ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे कुबेर देवता आपल्यावर कृपा करते, असे मानले जाते.
advertisement
6/6
जेड प्लांट - दक्षिण दिशेने जेड प्लांट लावणं देखील खूप शुभ मानलं जातं. या दिशेला जेड प्लांट लावल्यानं प्रत्येक कामात यश मिळतं असं मानलं जातं.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Vastu Tips: श्रीमंतांच्या घरी दक्षिण दिशेला या गोष्टी ठेवलेल्या पहाल; पैसा-भरभराटीचं गमक