29 नोव्हेंबरला शुक्राचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश, या 3 राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे परिणाम
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : : आपल्या जीवनात येणारे चढ-उतार हे अनेकदा ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलांमुळे होत असतात. काही ग्रहांच्या हालचाली काही राशींना लाभदायक ठरतात, तर काहींसाठी आव्हाने निर्माण होतात.
advertisement
1/6

आपल्या जीवनात येणारे चढ-उतार हे अनेकदा ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलांमुळे होत असतात. काही ग्रहांच्या हालचाली काही राशींना लाभदायक ठरतात, तर काहींसाठी आव्हाने निर्माण होतात. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला अत्यंत शक्तिशाली आणि शुभ ग्रह मानले गेले आहे. प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य, आर्थिक प्रगती आणि आनंद देणारा ग्रह म्हणून त्याची ओळख आहे. शुक्र जेव्हा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम अनेक राशींवर होतो.
advertisement
2/6
सध्या शुक्र विशाखा नक्षत्रात आहे आणि 29 नोव्हेंबर रोजी तो अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनि असून, शनि आणि शुक्र दोन्ही ग्रह परस्परांचे मित्र आहेत. त्यामुळे शुक्रचा हा नक्षत्र बदल अनेक राशींना सकारात्मक फळे देणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींचे भाग्य आता जोरात चमकणार आहे.
advertisement
3/6
वृषभ - शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी ग्रह असल्याने, या बदलाचा सर्वाधिक फायदा वृषभ राशीला होईल. काही दिवसांपासून कामात अडथळे येत होते, विचारांचा गोंधळ वाढला होता, पण आता परिस्थिती अनुकूल होईल. प्रलंबित कामे जलद पूर्ण होतील. तसेच आर्थिक स्थिती स्थिर आणि मजबूत होईल.
advertisement
4/6
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्रचा नक्षत्र बदल अत्यंत शुभ साबित होईल. गेल्या काही काळात कामाचे दडपण वाढले होते, पण आता त्यातून दिलासा मिळेल. अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामात नव्या प्रकारची उत्सुकता आणि ऊर्जा मिळेल. कुटुंबीयांना अधिक वेळ देता येईल. मानसिक तणाव कमी होईल. कर्क राशीसाठी हा काळ आनंद आणि प्रगती घेऊन येणारा आहे.
advertisement
5/6
तूळ - तूळ राशीचाही स्वामी शुक्र आहे. त्यामुळे शुक्रच्या बदलाचा थेट फायदा या राशीच्या लोकांना मिळणार आहे. मानसिक त्रास आणि अस्थिरता गेल्या काही महिन्यांत वाढली होती.परंतु आता त्यातून मुक्ती मिळेल.
advertisement
6/6
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
29 नोव्हेंबरला शुक्राचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश, या 3 राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे परिणाम