Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; तिसऱ्या आठवड्यात मोठी संधी, अर्थलाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: 16 ते 22 फेब्रुवारी या आठवड्यात ग्रहांची स्थिती खास असेल. शुक्र, बुध, राहू आणि सूर्य कुंभ राशीत असतील. त्यामुळे बुधादित्य, शुक्रादित्य, ग्रहण, चतुर्ग्रही ते लक्ष्मी नारायण योग तयार होतील. यासोबतच 17 फेब्रुवारीला चंद्रही कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे पंचग्रही योग तयार होईल. अशा स्थितीत 12 राशींच्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसून येतील, ग्रहस्थितीनुसार सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ.
advertisement
1/7

सिंह (Leo) - सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपलं आरोग्य आणि नाती या दोन गोष्टींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नातेवाईकांसोबत काही मुद्द्यावरून गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे छोट्या गोष्टींचा बाऊ करू नका. जमीन किंवा व्यवसायाशी संबंधित वाद असतील तर ते कोर्टात नेण्यापेक्षा चर्चेतून सोडवणं जास्त हिताचं ठरेल.
advertisement
2/7
सिंह - नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमध्ये आपल्या विरोधकांपासून सावध राहावं, ते तुमच्या कामात अडचणी आणण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणाच्याही षडयंत्राला बळी पडू नका. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा चढ-उताराचा असेल, त्यामुळे जोखमीची गुंतवणूक करणं टाळा. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात कमी लागेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः पोटाचे त्रास होऊ शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या, तरच तुमचं प्रेमजीवन सुखद राहील.भाग्यशाली रंग: तपकिरीभाग्यशाली अंक: 9
advertisement
3/7
कन्या (Virgo) - कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणतंही काम अर्ध्या मनाने करू नये, अन्यथा झालेलं काम बिघडू शकतं. यश मिळवण्यासाठी आणि पैशांची तणचण भासू नये म्हणून आठवड्याच्या सुरुवातीलाच पैशांचं बजेट ठरवा. कोणत्याही कामात शॉर्टकट मारू नका किंवा नियम तोडू नका, नाहीतर नको त्या अडचणीत फसाल. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायासोबतच कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीची चिंता तुम्हाला सतावू शकते, ज्यामुळे धावपळ वाढेल.
advertisement
4/7
कन्या - आठवड्याच्या उत्तरार्धात कामासाठी घराबाहेर किंवा लांबचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी नवीन ओळख करून देणारा आणि फायदेशीर ठरेल. जीवनात काही सकारात्मक बदल पाहायला मिळतील, पण सगळं व्यवस्थित राहावं असं वाटत असेल तर पारदर्शकता ठेवा. विशेषतः प्रेमसंबंधात जोडीदाराशी प्रामाणिक राहा. वैवाहिक आयुष्यात शांतता हवी असेल तर विनाकारण वाद घालणं टाळा.भाग्यशाली रंग: पिवळाभाग्यशाली अंक: 3
advertisement
5/7
तूळ (Libra)तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच शुभ आणि फायद्याचा असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या मोठ्या अडचणीशी लढत होता, ती आता सुटू शकते. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला हवं तसं यश मिळेल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील पण सोबत खर्चही वाढतील. आठवड्याच्या सुरुवातीला मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमची समाजात मान उंचावेल. राजकारण आणि समाजकारणात असलेल्या लोकांची लोकप्रियता वाढेल आणि त्याचा फायदा भविष्यात नक्की होईल. आठवड्याचा उत्तरार्ध जास्त मजेत जाईल. तरुण मंडळी मित्रांसोबत फिरायला जाण्याचे किंवा पार्टीचे प्लॅन्स करतील. चैनीच्या वस्तूंवर थोडा जास्त खर्च होऊ शकतो. व्यावसायिकांना एखादा मोठा व्यवहार किंवा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार होईल. नोकरीत तुमचा दबदबा वाढेल आणि हाताखाली काम करणाऱ्यांची संख्याही वाढू शकते. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन खूप छान राहील.भाग्यशाली रंग: गुलाबीभाग्यशाली अंक: 4
advertisement
6/7
वृश्चिक (Scorpio) - वृश्चिक राशीच्या लोकांनी जर छोट्या छोट्या अडचणींकडे दुर्लक्ष केलं, तर हा आठवडा खूपच फलदायी ठरेल. जवळच्या लोकांच्या मदतीने तुमची ठरलेली कामं वेळेत पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या कष्टाचं पूर्ण चीज या आठवड्यात होईल. तुम्हाला केवळ कामात यश मिळणार नाही, तर समाजात प्रतिष्ठाही वाढेल. जर तुम्ही व्यवसायात असाल, तर या आठवड्यात तुम्ही एखादा धाडसी निर्णय घेऊ शकता, जो व्यवसायाला उंचीवर नेण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
advertisement
7/7
वृश्चिक - आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा बिझनेस डील फायनल होऊ शकतो, पण तत्पूर्वी जाणकारांचा सल्ला नक्की घ्या. घरातले मालमत्तेचे वाद मोठ्यांच्या मध्यस्थीने मिटतील. महिलांचा कल धार्मिक कामांकडे जास्त असेल. दानधर्मात तुमचं मन रमेल. कुटुंबात प्रेम आणि एकोपा राहील आणि नातेवाईकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधांसाठी हा काळ खूपच रोमँटिक आणि सुखद असेल.भाग्यशाली रंग: आकाशी निळाभाग्यशाली अंक: 6
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; तिसऱ्या आठवड्यात मोठी संधी, अर्थलाभ